झाडांना नातेवाईक असतात!
झाडांना नातेवाईक असतात!
झाडं……..झाडांनाही मायबाप असतात. पती असतो आणि परीवारही असतो. असे म्हटल्यास कोणी नक्कीच वेड्यात काढतील. परंतू आपल्या डोक्यावर अधिक ताण दिल्यास नक्कीच असे वाटायला लागते की झाडांनाही मायबाप असतात. पतीही असतो आणि परीवारही.
माणूस हा विचारशील प्राणी आहे. या माणसाचा जेव्हा जन्म होतो. तेव्हा त्याला माहित नसतं की त्याची आई कोणती आहे. जेव्हा ती महिला त्याला आपल्या स्तनाला लावत असते. तेव्हा त्याला कळतं की ही माझी आई असेल. त्यावेळी तो लहान असतो. त्याला कळत नसतं की आई म्हणजे काय? त्याला बोलताही येत नाही. परंतू जसजसा तो मोठा होतो. तसतशी त्याला आई समजते. तिचा स्पर्शही कळतो. त्यातच आई कोण आहे तेही. तो तेव्हा रडतो. जेव्हा तो दुस-याजवळ जातो. हळूहळू त्याला बापही कळायला लागतो. जेव्हा काही दिवस निघून जातात आणि त्याला हळूहळू त्याचे नातेवाईकही कळतात.
झाडांचंही असंच आहे. त्यांनाही मायबाप असतात. पण नेमके मायबाप कोण असा प्रश्न सर्वांनाच पडत असतो. तर झाडांची माय माझ्या मतानुसार माती आणि बाप पाणी असू शकते. कारण जी जन्म देते, ती आपली आई असते. यावरुन झाडांना माती जन्म देते. त्यामुळे ती त्याची आई. तसेच आई ही सदोदीत बाळाच्या जवळ राहते. तशी मातीही रोपट्याला अंतर देत नाही. आई जशी बाळाला अंतर देत नाही तशी. ती त्याला अंतर देत नाही. प्रसंगी बाप वेळोवेळी बाळाजवळ न राहता बाहेर कामाला जात असतो. तो त्याचेजवळ नसतो.
बाप जसा आपल्या बाळापासून कामासाठी दूर जातो. अगदी तशीच रोपट्याच्या बाबतीत झाडांची अवस्था असते. पाणीही प्रत्येकवेळी मातीजवळ वा रोपट्याजवळ नसते. ते पाणी सुकून जाते. तेव्हा मुळं ही आपल्यामध्ये जमीनीतील ओलावा धरुन ठेवत असतात. याचाच अर्थ असा की माती ही बाळाची आई व पाणी हा पिता आहे.
झाडाचे इतरही नातेवाईक असतात. जसे आपल्याला काका, मामा, मावश्या असतात. हे मामा, मावशी, काका, आत्या झाडांनाही नसतात असे नाही. त्यांनाही काका काकी, मामामामी असतात. सर्वच नातेवाईक असतात. त्यांचे नातेवाईक म्हणजे पशू पक्षी……जे पशू त्या झाडांच्या सावलीत राहात असतात. तसेच जे पक्षी त्याच्या फांद्यांवर घरटे बांधत असतात. तसेच मुंग्या, माकोडे हेही त्यांचे नातेवाईक असतात. ज्याप्रमाणे नातेवाईक हे माणसाला संकटात मदत करतात. तशीच मदत ह्या मुंग्या, माकोडे झाडांना संकटात करीत असतात. कोणी त्यांना कापायला आलेच तर त्यांना चावून त्यांना झाड कापण्यापासून परावृत्त करण्याचे काम ह्या मुंग्या करीत असतात.
विशेष सांगायचं म्हणजे आपले जसे शत्रू असतात. तसेच झाडांचेही काही शत्रू असतात. जसे आपल्या शत्रूचे प्रकार आहेत. आपसी शत्रू व बाहेरचे शत्रू. आपले आपशी शत्रू असतात. ते आपल्या जवळ जवळ अगदी प्रेमानं राहून आपल्या पाठीत सुरा खुपसतात तर बाहेरचे शत्रू हे आपल्या जवळ राहात नाही. ते आपल्या जवळ न राहता दूर राहून वैमनस्यानेच वागतात. तसं झाडाचंही आहे. झाडांनाही आपसी शत्रू आहेत आणि बाहेरचेही शत्रू आहेत. झाडांचे आपसी शत्रू म्हणजे अमरवेल व बांडगुळ सारख्या वनस्पती. ह्या वनस्पती त्या झाडावरच उगवतात व त्याच झाडातून त्याचं रक्त शोषून जगत असतात. नव्हे तर त्या झाडांना संपवत असतात. तसेच ज्याप्रमाणे आपल्याला बाहेरचे शत्रू असतात. त्याप्रमाणे झाडांचे बाहेरचे शत्रू म्हणजे लाकुडतोड करणारी मंडळी. हे शत्रू केव्हा धोका करतील आणि केव्हा संपवतील हे सांगता येणे अशक्य आहे.
झाडांना पतीही असतो. ज्याप्रमाणे आपल्याला पती असतो. तसाच पती. तो पती म्हणजे उडणारे फुलपाखरु. हे फुलपाखरु या झाडांना येणा-या फुलरुपी मुलींना छळतात. याचाच अर्थ म्हणजे झाडांची मुलगी म्हणजे त्याची फुलं.
विशेष सांगायचं म्हणजे झाडांना मायबाप असतात. नातेवाईक, परीवार. शत्रू आणि पतीही शिवाय मुलंही……..झाडांना भावनाही असते. ती झाडं आत्महत्या देखील करतात. मुख्यतः झाड पूर्ण स्वरुपात संपलं नसलं तरी त्याच्या काही फांद्या वाळल्या दिसतात. हे अचानक अवयव वाळलेलं सापडणं ही त्या झाडांवरील फांद्याची आत्महत्या आहे. कधी कधी अख्खं झाडंच वाळतं. कोणी त्याला किडा लागलेला असेल असंही मानतं. ते खरंही असतं. कारण असे किडे झाडांच्या मुळांना लागतात. परंतू काही झाडांना असे किडे लागलेले दिसत नाहीत. त्यातच ते झाड वाळतं. ती आत्महत्याच असते झाडांची. परंतू आपल्याला ते कळत नाही.
झाडांना नातेवाईक असतात असे म्हटल्यास सर्वजण हसतील. परंतू झाडांनाही भावना असते असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण झाडांना भावना असते हे आधीच सिद्ध केलं जगदीशचंद्र बोस यांनी. त्यांनी लाजाळूच्या झाडावर प्रयोग केला. त्यात एक सुई त्यांनी लाजाळूच्या झाडांना लावली होती. तसेच त्या सुईला एक वायर लावून तो वायर इलेक्ट्रीक बोर्डात टाकला होता. त्यातच त्या इलेक्ट्रीक बोर्डातील स्विच सुरु होताच लाजाळूच्या झाडाला करंट लागत असे व ते झाड पानं मिटवीत असे. यावरुन झांडांनाही भावना असतात हे त्यांनी सिद्ध केले. यावरुनच एक सांगावेसे वाटते की झाडांनाही मायबाप असतात. नातेवाईक पण असतात. तसेच शत्रूही असतात. यात शंका नाही. तसेच ते आत्महत्याही करतात हे तेवढेच खरे आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०
One Comment