तुम्ही काहीही करा या घटकांचा योग्य अमल नसेल तर लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही..
तुम्ही काहीही करा या घटकांचा योग्य अमल नसेल तर लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही..
‘(१) राष्ट्रीय चारित्र्य : लोकशाहीच्या यशासाठी नागरिकांचे चारित्र्य शुद्ध असणे आवश्यक आहे. नागरिकांचे चारित्र्य निकृष्ट असेल तर लोकशाही यशस्वी होणे कठीण आहे. यासाठी लोकांना त्यांच्या अधिकार आणि कर्तव्याची जाणीव करून द्यायला पाहिजे. लोकांनी त्यानुसार जबाबदारीने वागले पाहिजे. त्याग, बलिदान, प्रामाणिकपणा, देशप्रेम, स्वावलंबन, परस्पर सहकार्याची भावना जी राष्ट्रीय चारित्र्यासाठी आवश्यक आहे ती जनतेत निर्माण होण्याची गरज आहे. त्यामुळे लोकशाहीतील बहुतेक दुर्गुण दूर होण्यास मदत होईल. त्यानंतर लोकशाहीला आपण खऱ्या अर्थानि जबाबदार शासन म्हणू शकतो. सर्व दोषांचे मूळ लोकांची नियत साफ नसण्यातच असल्यामुळे यावर एकदा विजय मिळवला तर इतर दोष आपोआप दूर होतील.
((२) शिक्षणाचा प्रसार :शिक्षणाशिवाय मनुष्य पशु होय. शिक्षणाच्या अभावामुळे गरिकांना त्याच्या अधिकार आणि कर्तव्याची जाणीव होत नाही. शिक्षणामुळे नैतिक गुणांचा विकास होतो आणि राष्ट्रीय चारित्र्य निर्मितीसाठी मदत होते. शिक्षणामुळे मनुष्याचा दृष्टिकोन व्यापक होतो. सामाजिक आणि राजकीय प्रश्न निःस्वार्थ बुद्धीने सोडवण्याची क्षमता निर्माण होते. जॉन स्टुअर्ट मिलच्या मते, “प्रौढ मताधिकाराबरोबर सार्वजनिक शिक्षणाचा प्रसार लोकशाहीच्या यशस्वितेसाठी आवश्यक आहे. लोकशाहीत मतदानाचा अधिकार सर्वांनाच माप्त होतो. शिक्षणाच्या अभावामुळे बहुसंख्य नागरिक आपल्या मताचा योग्य उपयोग करू शकत नाही. यासाठी अनिवार्य शिक्षण पद्धतीची आवश्यकता आहे.” अशाप्रकारे शिक्षण हे लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी आवश्यक अट आहे.
(३) स्वातंत्र्य आणि समता : स्वातंत्र्य आणि समता लोकशाहीचे आधारभूत तत्व आहे. बोपर्यंत लोकांना स्वातंत्र्य प्राप्त होत नाही तोपर्यंत समानता निर्माण होऊ शकत नाही. लोकांना समान संधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत ते शासनात भाग घेऊ शकत नाही. समतेमध्ये आर्थिक आणि सामाजिक दोन्ही प्रकारच्या समतेची स्थापना होणे आवश्यक आहे. केवळ राजकीय समता
निर्माण यशस्वी नाही. समाजात धर्म, जात, पेश, लिंग, भाषा या आधारावर भेदभाव वर संपर्क निर्माण होणे अपरिहार्य आहे. परस्परांचे शोषण गर अशा असुरक्षित आणि अशांततेच्या वातावरण लोकशाही कधीय यशस्वी होऊ शकत नाही. यासाठी समाजातील भेदभाव सर्वप्रथम दूर करणे अत्यंत आवश्यक आहे.
(४) सामाजिक न्याय: लोकशाहीच्या यशासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट म्हणजे सामाजिक न्यायाच्या अमलबजावणीसाठी आर्थिक समानता निर्माण व्हायला पाहिजे. श्रीमंत आणि गरीबातील अंतर जोपर्यंत गरिबांची पिळवणूक होते.तोपर्यंत लोकशाहीची कल्पना करणे व्यर्थ आहे. प्रत्येकाला आर्थिक विकासाची संधी उपलब्ध होणे आर्थिक समानतेची आवश्यक अट आहे.त्यासाठी उत्पादन साधनांचे विकेंद्रीकरण आणि उत्पादित वस्तूचे समान वितरण होणे आवश्यक आहे.
त्यामुळे वाहोऊन इतरांचा विकास होणार नाही. सामाजिक न्याय प्रस्थापित झाल्याम सर्वांना समान संधी उपलब्ध होतील. लोकात परस्पर प्रेम, एकता, सहकार्याची भावना निर्माण होईल हे गुण लोकशाहीच्या यशासाठी अत्यंत आवश्यक आहेत. सामाजिक न्यामाशिवाय शिक्षण, स्वातंत्र्य, समतेच्या लोकशाही त्याला अर्थ नाही. विशेषतः भारतीय परिस्थितीत ज्या ठिकाणी विविधता आहे त्या ठिकाणी सामाजिक न्यायाची अत्यंत आवश्यकता आहे.
(५) आर्थिक समता: स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक समानता निर्माण आपला पाहिजे, श्रीमंत आणि गरीबाढील अंतर जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आदर्श लोकशाहीची कल्पना व्यर्थ आहे. अर्थ हेच सर्व अनर्थाचे मूळ आहे. जोपर्यंत गरिबांची पिळवणूक होते तोपर्यंत लोकशाहीची कल्पना करणे व्यर्थ आहे. प्रत्येकाला आर्थिक विकासाची संधी उपलब्ध होगे आर्थिक समानतेसाठी आवश्यक अट आहे. यासाठी उत्पादन साधनांचे विकेंद्रीकरण आणि उत्पादित वस्तुचे समान वितरण होणे आवश्यक आहे. तेव्हा आर्थिक विषमता न होऊ शकते. आर्थिक समवेशिवाय कोणत्याही प्रकारच्या स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यात येऊ शकत नाही. यासाठी राज्याने प्रत्येकाला काम द्यावे, कामाप्रमाणे योग्य मोबदला द्यावा योग्य वेतनाची शाश्वती द्यावी. त्याशिवाय तोक शासनकार्यात भाग घेऊ शकत नाही. स्थानच्या आवश्यक गरजा पूर्ण झाल्यानंतरच व्यक्ती समाजकार्य करू शकते. अशामकारे आर्थिक समता ही लोकशाहीच्या यशाची गुरुकिल्ली आहे.
(6)राजिय जागृती: नागरिकांना केवळ अधिकार आणि स्वातंत्र्य देऊन लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. नागिरकांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा उपयोग करण्याची क्षमता आणि जागरुकता जोपर्यंत त्यांच्यात निर्माण होत नाही तोपर्यंत अधिकार आणि स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही. जनतेच्या जागरूकतेमुळे शासन कार्यक्षम राहते. लोकजागर नसतील तर नेत्यांना आपली निरंकुश सत्ता प्रस्थापित करणे सोपे जाते. लोकांना त्यांच्या अधिकार आणि कर्तव्याची जाणीव करून देणे, त्यांच्या राजकीय जागृती निर्माण करणे हे नेत्यांचे कार्य आहे. जनतेच्या जागरूकतेमुळे शासनावर नियंत्रण ठेवणे सोपे होते. अशाप्रकारे राजकीय जागरुकता लोकशाहीची आवश्यक आहे.
(७) राजकीय पक्ष :राजकीय पक्षात विभिन्न पक्षांचा समावेश होतो. लोकशाहीसाठी राजकीय पक्ष असणे अत्यंत आवश्यक आहे त्यारही संघरित विरोधी पक्षाची भूमिका सोकशाहीत अत्यंत महत्वाची असते. विरोधी पक्ष सतास्य पक्षाचे दोष दाखवून जनतेत जागृती निर्माण करतो सत्तारूढ पक्षाला नियंत्रित ठेवण्याचे कार्य विरोधी पक्ष करतात. त्यामुळे मजबूत विरोधी
पक्ष आदर्श लोकशाहीची पहिली अर आहे. लोकांच्या मागण्यांचे प्रगटीकरण आणि सुसूत्रीकरणाची कार्ये राजकीय पक्ष करतात राजकीय पक्षाच्या संघटनेचा आधार व्यापक राजकीय भावना असला पाहिजे. याचा अर्थ असा की, पक्षाच्या संघटनेचा आधार जाती, धर्म, भाषाशासनाचामा आधार अशामकारे संकुचित असला तर पक्षात संघर्ष निर्माण होऊन लोकशाला धोका निर्माण राजकीय पक्षाचे कार्य राजकीय समानीकरणाचे आहे. त्याचप्रमाणे जनतेला योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी राजकीय पक्षाची असते. अशा लोकशाहीचा पाया होय.
(८) स्वतंत्र न्यायालयाची व्यवस्था: शासनाची मूलपटनेने असतात. ती तत्वे अमलात आणण्याची पद्धती म्हणून लोकशाहीचा स्वीकार केल्या जातो. नागरिकांच्या अधिकार आणि स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी निपक्ष न्यायालयाची आवश्यकता असते. निस स्वतंत्र न्यायालय विधिमंडळ आणि कार्यकारी विभागावर नियंत्रण कार्य करवात शासनाच्या कार्याची योग्यता आणि अयोग्यता ठरविण्याचे काम न्यायालय करतात विधिमंडळानी केलेला कायदा जर पटनेच्या विरुद्ध असेल तर त्याला अवैध घोषित करण्याचा अधिकार न्यायालयाला असतो. शासन जास्तीतजास्त कार्यक्षम होण्यासाठी न्यायालयाच्या
स्वातंत्र्याची आवश्यकता असते. न्यायालयाचे स्वातंत्र्य केवळ शासनाच्या कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक नाही. तर नागरिकांचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी देखील आहे. नकारे घटनेच्या मूलभूत अधिकाराच्या रक्षणासाठी स्वतंत्र निश्पक्ष न्यायाची आवश्यकता असते.
(९) निपक्ष:माध्यमे: वर्तमानपत्रे मसूचन माध्यमापैकी वर्तमानपत्रे अत्यंत महत्वाचे माध्यम आहे. वर्तमानपत्राद्वारे शासनाच्या गुणदोषांची माहिती लोकांना प्राप्त होत असते. वर्तमानपराची पञ्चनिष्ठतेच्या भावनेतून माहिती प्रसारित न करता राष्ट्रनिष्ठेच्या भावनेतून माहिती प्रसारित करायला पाहिजे. त्यामुळे आदर्श लोकमताची निर्मिती होऊन लोकशाही शासनाचे दोष दूर होण्यास मदत होईल. वर्तमानपावर कोणत्याही नकारचे नियंत्रण असू नये, स्वतंत्र आणि निभिद्र वर्तमानपत्रे लोकशाहीची हमी होय. वर्तमानपत्रांना राजकीय सामाजीकरणाचे लोकांना मार्गदर्शन करण्याचे, लोकहिताचे रक्षण करण्याचे महत्वाचे कार्य करावे लागते. त्याचप्रमाणे वर्तमानपत्रे सत्ताधारी पक्षाच्या निरंकुश वर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे कार्य करते.
(१०)सत्तेचे विकेंद्रीकरण: लोकशाही हे लोकांचे शासन आहे. त्यामुळे स्थानिक प्रश्न स्थानिक लोकांनीच पुढाकार घेऊन सोडविले पाहिजे. लोकांना राज्यकारभार करण्याचे प्रशिक्षण स्थानिक स्वराज्य संस्था देवान तोकांमध्ये जमादारीची जाण वाढविण्यासाठी मनेचे विकेंद्रीकरण होणे अत्यंत आवश्यक असते. आपले प्रश्न आपल्या सोय आहेत या भावनेतून लोक प्रशासनाच्या कार्यात भाग घेतात. यासाठी ग्रामपंचायरषद इत्यादी स्थानिक संस्थांची निर्मिती करणे लोकशाला पुरक तरते निर्माण हो प्रमुख कारण म्हणजे सत्तेचे केंद्रकरण होय त्यामुळे राजकीय आणि आर्थिक सहेचे विकेंद्रीकरण लोकशाहीच्या यशस्वितेसाठी आवश्यक आहे.
(११)व्यक्ती प्रतिष्ठा: राज्य हो मानवनिर्मित संस्था आहे. राज्य निर्मिती लोककल्याणासाठी झाली .व्यक्तिहित हे राज्याचे उद्देश आहे . आपल्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी
व्यक्तित्व विकासाला भरपूर वाव देणे गरजेचे आहे.व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या गुणांचा विकास होण्यासाठी राज्याने आवश्यक वातावरण निर्माण करायला पाहिजे. व्यक्तित भाषण मुद्रण विचार स्वातंत्र्याला देणे आवश्यक आहे.
लिखित घटना : घटना लिखित असल्यास सत्ताधारी पक्ष स्वेच्छाचारी बागत नाही. कारण न्यायालयाला घटनेचे रक्षण करण्याचा अधिकार असल्यामुळे पान आपल्या कृतीचा जबाब न्यायालयात द्यावा लागेल. शासनाचे घटनाविरोधी कृत्य अदेश ठरविण्याचा अधिकार न्यायालयाला असतो. लिखित घटना स्थैर्य देणारी असावी म्हणजे पटन वारंवार परिवर्तन करता घेऊ नये. तसेच अतिशय कठोर देखील असू नये तर यातील सुवर्णमध्य साधला जाणे अत्यंत आवश्यक आहे. तात्पर्य, परिस्थितीप्रमाणे घटनेत दुरुस्ती करण्याची सोय असावी अशाप्रकारे लिखित घटना लोकशाहीच्या यशासाठी आवश्यक तत्व आहे.
लोकशाहीच्या यशासाठी व्यक्तींनी अंधश्रद्धा, व्यक्तिपूजा, अज्ञान दूर करणे आवश्यक आहे. परस्पर मत्सर, आळस, दारिद्र्य हे दुर्गुण बाजूला सारून सहकार्य, बंधुत्व, समाजप्रियता, शिस्त, प्रामाणिकपणा, सचोटी या सद्गुणांची जोपासना करायला पाहिजे. भुकेल्या, अंधश्रद्धाळू जनतेला लोकशाहीचे महत्व कळत नसते. त्यांच्या अवगुणांचा फायदा पुढारी घेऊन लोकशाहीच्या नावाखाली भांडवलशाही निर्माण करतात. यासाठी भागरिकांनी डोळसपणे वागले पाहिजे. कोणताही निर्णय सारासार विचार करून घेतला पाहिजे.
संदर्भ: राम मुठाळ , राजकीय सिद्धांत आणि राजकीय विश्लेषण