ग्रामीण

अतिवृष्टी नुकसानग्रस्त वंचित शेतकऱ्यांच्या न्याय ,हक्कासाठी ‘गाव तिथे उपोषण’;कमळवल्ली गावचा सहभाग

अतिवृष्टी नुकसानग्रस्त वंचित शेतकऱ्यांच्या न्याय ,हक्कासाठी ‘गाव तिथे उपोषण’;कमळवल्ली गावचा सहभाग

 

सुनील शिरपुरे/ झरीजामणी

 

वणी, झरीजामणी व मारेगाव या तीन तालुक्यातील माहे ऑगस्ट, सप्टेंबर 2021 मधील सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे कापूस, सोयाबीन, तुर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यातल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या त्रिशंकु महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वणी विधानसभा क्षेत्रातील 3 तालुक्यात येणा-या 7 मंडळातील 125 गावांतील हजारो शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाई मदतीपासून चुकीच्या पद्धतीने वंचित ठेवण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने शासनाच्या महावेध व स्कॉयमेट खाजगी कंपनीद्वारे मंडळाच्या ठिकाणी लावलेल्या पर्जन्यमापक यंत्रात 65 मी.मी. पाऊस पडला ते मंडळ अतिवृष्टी तसेच दुस-या मंडळ यंत्रात 65 मी.मी. पाऊस दाखविला नाही. म्हणून तांत्रिक बाबींवर बोट ठेवून ते मंडळ अतिवृष्टी मदतीपासून वंचित ठेवण्यात आले.

माहे ऑगस्ट मधील नैसर्गिक प्रकोप अतिपावसाने कापूस पडला, बोंडे सडली, सोयाबीन पडून चिखलमाती झाली. यामुळे शेतकरी हवालदिल झाला व उत्पन्न अभावी शेेतक-यांची दिवाळी अंधारात गेली. ज्या पर्जन्यमापक यंत्राच्या भरोशावर अतिवृष्टी 65 मी.मी. पाऊस जाहीर केला. त्याची पर्जन्य मोजण्याची क्षमता केवळ 1/2 फुटच होती. एकाच गावातील शेतक-यांची शेती 2 मंडळात 0 सिमारेषेवर असतांना ‘शिवधूरा बदलला मंडळ बदलले’ म्हणून अतिवृष्टी नाही. पाऊस पडतांना सरकारने शिवधू-यावर भींत घातली होती का? चुकीच्या पद्धतीने पावसाचे मोजपाप करून शेतक-याशी शासनाने बेईमानी करून हक्काच्या मदतीपासून वंचित ठेवले.

याबाबत शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून पत्रव्यवहाराद्वारे मदतीची मागणी करण्यात आली. यंत्रणेद्वारे शासनाला फेर सर्व्हेसाठी पत्र देण्यात आले. परंतु शासनाचा आदेश निघालाच नाही. त्यानंतर तहसिल कार्यालयापुढे धरणे आंदोलन करून विधानसभेत यवतमाळ जिल्हा अतिवृष्टीतील वंचित मंडळाचे नुकसान भरपाईमध्ये समाविष्ट करण्याचा प्रश्न मांडला. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री महोदयांनी विधानसभेच्या पवित्र सभागृहात आम्ही शेतक-यांचे प्रतिनिधी म्हणून लवकरच फेर सर्व्हेक्षण करून नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत करू असे जाहीर उत्तर दिले. परंतु अद्यापही दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यात आली नाही. अशाप्रकारे या तिघाडी सरकारकडून शेतक-यांचा विश्वासघात करून त्यांचा छळ करण्यात येत आहे. त्यामुळे या जुल्मीधोरण राबविणा-या बेजबाबदार महाविकास आघाडी सरकारला आठवण करून देण्यासाठी व डोके ठिकाणावर आणण्यासाठी आणि अन्नदाता शेतक-याला न्याय व हक्क मिळण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय कमळवेल्ली येथे ‘गाव तिथे उपोषण’ अंतर्गत उपोषण करण्यात आले आहे.

या उपोषणात झरीजामणी तालुका युवा आंदोलन सचिव प्रविणभाऊ चुक्कलवार, श्रीनिवास येलचलवार, मोहनराव चुक्कलवार विठ्ठलजी ठाकरे, आशारेड्डी इंदुरवार, रामन्नाजी चुक्कलवार, भिमराव टेकाम, वामनराव हलवेले, पुरुषोत्तम मरापे, धनराज सिडाम, सतिष बारेवार, गणेश नुगुरवार, गंगन्ना परदेशवार, उमेश चुक्कलवार, महेंद्र हलवेले व इतर शेतक-यांनी सहभाग घेतला.

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button