लता मंगेशकर; एक अलौकिक नेतृत्व!
लता मंगेशकर; एक अलौकिक नेतृत्व!
लता मंगेशकर आज आपल्यात नाहीत. त्याचं निधन म्हणजे एक प्रकारची संगीत क्षेत्रातील अनहोणी होय असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
आज लता मंगेशकर आपल्या घरी नसल्या तरी त्यांचं नाव जेव्हापर्यंत चंद्र, सुर्य आणि तारे आहेत. तेव्हापर्यंत त्यांचं नाव राहणार आहे. त्यांचा जन्म इंदोर येथील असून तो २८ सप्टेंबर १९२९ ला झाला. तसेच त्यांचा मृत्यू ब्रीच कँडीच्या मुंबईच्या रुग्णालयात झाला.
लता दीदी ह्या महान आहेत. कारण तिनं संगीत विश्वात ९८० च्या वर चित्रपटात अर्थात एक हजारच्या वर चित्रपटात गाणी लिहिली. वेगवेगळ्या भाषेत गाणी लिहिली.
लता मंगेशकर यांना आणखी चार भावंडं. आशा मीना उषा आणि ह्रृदयनाथ. सुरुवातीला सुसंपन्न घराणं. परंतू १९४२ ला लतादीदीच्या वडीलांचं निधन झालं. त्यानंतर गरीबी आली. त्यातच अत्यंत काटकसर करुन लतादीदीनं गाण्याच्या क्षेत्रात प्रवेश केला. त्यात तिला तिच्या वडीलांच्या शिकवणूकीचा फायदा झाला.
पंडीत दिनानाथ मंगेशकर हे शास्रीय संगीत क्षेत्रात पुर्वी अग्रगण्य नाव होतं. त्यांनी आपल्या चारही मुलांना संगीताचं ज्ञान दिलं. परंतू वडील जेव्हा मरण पावले, तेव्हा लतादीदी मोठी होती. ती तेरा वर्षाची होती. तेव्हा सर्व कुटूंबाची जबाबदारी तिच्यावर आली होती.
लतादीदी लहान असतांनाच त्यांच्या समाजात देवदासी प्रथा असल्यानं पहिलं लेकरु हे देवदासी म्हणून देवाला वाहण्याची प्रथा असल्यानं पंडीत दिनानाथ मंगेशकर हे विचलीत होते. कारण त्यांना देवदासी प्रथा मान्य नव्हती. म्हणून की काय, त्या चारही मुलांना घेवून पंडीत दिनानाथ गोव्याला आले. तेथे ते काही काळ राहिले. तिथूनच लतादीदींची कारकिर्द घडली. आजही गोव्यामध्ये मंगेशकरने बांधलेलं मंदीर म्हणजे तिच्या अस्तित्वाची साक्ष देते. लता मंगेशकर यांनी अंदाजे ३६ च्या वर भाषांमध्ये गायन केलं.
लतादीदीच्या वडीलांचे नाव दिनानाथ. तिच्या आईचं नाव शेवंती. दिनानाथ आणि शेवंतीची ती मोठी कन्या. तिची आई गुजराती होती. शेवंती ही दिनानाथची दुसरी पत्नी होती. त्यांची पहिली पत्नी नर्मदा. ती मरण पावल्यावर तिची सख्खी बहिण शेवंतीशी दिनानाथनं दुसरा विवाह केला.
पंडीत दिनानाथचं आडनाव हार्डीकर होतं. परंतू ते गोव्यातील मंगेशी गावातील रहिवासी असल्यानं त्यांचं नाव पुढे मंगेशकर पडलं.
लतादीदीचं जुनं नाव हेमा. परंतू तिचं नाव लता ठेवण्यामागे एक कथा आहे. एक भावबंधन नाटक. त्या नाटकात लतिका किरदार म्हणून लतानं काम केलं. जे दिनानाथनं बसवलं होतं. त्यानुसार ते नाटक एवढं गाजलं आणि त्यानुसार तिचं पात्र एवढं गाजलं की तिला लतिका म्हणून ओळखू लागले व पुढे त्याचा अपभ्रंश म्हणून लतादीदीचं लता नाव पडलं. लता शाळेत गेली. परंतू ती शिकली नाही. त्याचं कारण म्हणजे लतादीदीचं शाळेतील शिक्षीकेसोबत भांडण. पहिल्याच दिवशी तिचं शाळेतील शिक्षीकेसोबत भांडण झाल्यानं ती शाळेत कधीच गेली नाही. त्याचं झालं असं की पहिल्याच दिवशी ती आशाला घेवून ती शाळेत जेव्हा गेली. तेव्हा आशा लहान असल्यानं व तिचा हाथ कानाशी पुरत नसल्यानं शाळेतील शिक्षीकेनं तिला बसू दिलं नाही. त्याचाच राग म्हणून लतादीदीही परत शाळेत गेलीच नाही. दिनानाथनंही तिला तशी सक्ती केली नाही.
लतादीदी अभिनयाच्या क्षेत्रात आघाडीवर असल्यानं १९४२ ला तिच्या वडीलाच्या मृत्यूनंतर चित्रपट कंपनी मालक मास्टर विनायक मंगेशकर यांनी मदत केली व १९४२ ला पहिला चित्रपट निघाला. मंगलागौर. त्यानंतर लतानं मागं वळून पाहिलं नाही. ह्या चित्रपटात काम करतांना तिनं आधी नाटकात काम केल्याचा अनुभव कामात आला. तिनं माझे बाल, गजभाऊ, बडी माँ, जीवनयात्रा या चित्रपटात काम केले.
ज्याप्रमाणे लतानं चित्रपटात काम केलं. तसंच गाण्यातही. गायनाची पहिली संधी १९४२ ला मिळाली. मंगलागौर या चित्रपटाच्या रुपानं. त्यानंतर १९४३ ला गजाभाऊमध्येही लतानं गायनाचं काम केलं आहे.
अशाप्रकारे त्यांनी आपकी सेवा १९४६, बडी माँ १९४५ व शहीद१९४८ मध्ये गायन करुन आपला आवाज उच्चस्तरीवर पोहोचवला व अवघ्या वीस , वीस वर्षाच्या कारकिर्दीतच लतादीदीनं सिनेरसिकांच्या ह्रृदयाचा ठाव घेतला.
लतानं १९४८ मध्ये गुलाम हैदरच्या मजबूर चित्रपटात काम केलं व तेच गाणं अजरामर झालं. ते गाणं होतं. दिल मेरा तोडा, मुझे कही का ना छोडा. हे गाणं प्रथमच उच्चस्तराववर गेलं. त्यानंतर लतानं एकशेएक गाण्यांच्या गायनामध्ये मजल मारली.
तो काळच तसा होता की ज्या काळात केवळ लताचाच आवाज ऐकण्यासाठी लोकं चित्रपटगृहात जात. मधूबाला अभिनेत्री असलेला चित्रपट महल,१९४९ ला तो रिलीज झाला होता. याही चित्रपटानं लताला विशेष प्रसिद्धी दिली.
लता मंगेशकर एकशे एक हिट गाणे देत असतांना काही लोकं तिचे विरोधकही बनले होते. त्यातच तिला १९६२ मध्ये विष देण्याचाही प्रयत्न झाला. त्यातून त्या वाचल्या. परंतू ते कोणी दिलं होतं हे अजूनपर्यंत कळलं नाही.
लतानं अंदाजे आपल्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळवलेत. सन २००१ ला भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्नही मिळवला. आज स्वतः तिच्या नावाचाच पुरस्कार तिच्या जीवंतपणी दिला जात होता. काही काही पुरस्कार तर तिनं स्वतःच नाकारले होते.
लतानं आपल्या आयुष्यात एका व्यक्तीशी प्रेम केलं होतं. त्याचं नाव राजसिंह डुंगरपूर होतं. तो राजघराण्याशी संबंधीत होता. परंतू त्याच्या वडीलांना राजघराण्यातील मुलगी हवी होती. म्हणून त्यांनी रिश्ता नाकारला. त्यानंतर लतानं सी रामचंद्र यांच्यासोबत विवाह करण्याचा विचार केला. परंतू यातही तिला नैराश्य मिळालं. कारण सी रामचंद्र हे विवाहीत होते. त्यांना लताशी विवाह करायचाच नव्हता. कारण त्यांनी नंतर शांता नावाच्या मुलीशी विवाह केला.
लतादीदी ह्या स्वतंत्र्य जीवन जगल्या असल्या तरी त्या स्वतःसाठी जगल्या नाहीत. त्या इतरांसाठीही जगल्या. बेस्ट सींगरचा पुरस्कार दरवर्षी आपल्यालाच मिळणार हे पाहून त्यांनी स्वतः काही पुरस्कार उदार मनानं नाकारलीत आणि ते पुरस्कार त्यांना द्यायला लावलेत. तिच्या त्या याच उदार वृत्तीमुळं संगीत क्षेत्रात इतरही तिच्याचसारख्या पुरस्कार्थींना संधी मिळाली.
महत्वाचं म्हणजे तिच्यात नेतृत्व शक्ती होती. नेतृत्व केवळ राजनैतिक स्वरुपाचं नाही तर कौटूंबीक क्षेत्रातही नेतृत्व असायला पाहिजे. तेव्हाच वडील मरण पावल्यानंतर तिच्यावर कोसळलेल्या संकटावर तिला सक्षमपणं उभं राहता आलं नव्हे तर तिला त्या संकटाशी दोन हात करुन आपल्या परीवाराचंही पालनपोषण करता आलं. तिनं घरातील ही पारीवारीक केलेली सेवा, त्याच सेवेचं पुण्यकर्म की काय आज लतादीदींच्या निधनानं सारा भारत हरहळला. त्यांना लोकांनी शिरोधार्थ मानलं. भारत सरकारनं राष्ट्रीय दुखवटाही जाहिर केला. तसेच महाराष्ट्र सरकारनं एक दिवसाची सुटी.
लता दीदी ह्या भारतरत्न पुरस्कारापेक्षाही मोठ्या होत्या. त्यांनी गायलेले गाणे हे आजही अजरामर ठरलेले असून लोकांच्या ह्रृदयात ठाव घेवून आहेत. आनंद असो की दुःख लतादीदीनं गायलेलं गाणं नक्कीच ओठावर येतं आणि लतादीदींचं गाणं जेव्हापर्यंत ही जीवसृष्टी असेल तेव्हापर्यंत नक्कीच राहणार असे वाटते. शेवटी काय लिहावं. तिच्याबद्दल लिहिलं तेवढं कमीच आहे. ती ब्यानव वर्ष जगून दि. ०६/०२/२०२२ ला मरण पावल्या. इश्वर तिच्या आत्म्यास शांती प्रदान करो हीच प्रार्थना.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०