अंकिता’ला ‘न्याय’ मिळाला? –प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल
‘अंकिता’ला
‘न्याय’ मिळाला? –प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल
संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणाऱ्या अंकिता पिसुड्डे जळीत हत्याकांड प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी विकेश नगराळेला जन्म ठेपेची शिक्षा सुनाली व शेवटी या जळीत हत्याकांड प्रकरणी अंकीताला न्याय मिळाला,अशी प्रतिक्रिया समाजमाध्यमातून व्यक्त होऊ लागली असली तरी अंकीताच्या आरोपीला जन्मठेपेची जी शिक्षा सुनावण्यात आली त्यावरून तिला न्याय मिळाला असे म्हणता येणार नाही.अंकीतला जी यातना झाली तशी यातना या प्रकरणी आरोपीला न झाल्याने एकंदरीत तसे काही घडले नाही.,किंवा
तसे काहीही झालेले नाही. पण, ज्यांने हा अमानुषपणा केला, त्याला मात्र ‘न्याय’ मिळाला आहे. त्याच्या राक्षसी विकृतीचे कोडकौतुक झाले आहे. कारण, ‘अंकिता’च्या जळीत प्रकरणाने तिच्या आईवडिलांना यातना किती भोगाव्या लागल्या.?
दोन वर्षानंतर अखेरीस अंकीताला ‘न्याय’ मिळाला, असे आता मानले जाऊ लागलेले आहे. पण, खरेच त्याला ‘न्याय’ म्हणता येईल काय? कारण, अंकिताच्या
च्या न्यायाचा विषयच कुठे नव्हता. ‘ति’ तर मरून गेली आहे. तिला पेट्रोल टाकून मारून टाकण्यात आले त्यामुळे जी हयातच नाही, तिला न्याय मिळाला असे बोलणेही शुद्ध मूर्खपणा आहे. अशा बाबतीत न्याय मिळण्याचा विषयच नसतो. मग कायदा व न्यायालये कशासाठी असतात? अशा घटना घडू नये.? यासाठीच ना पण .. हत्या,बलात्काराच्या घटनांचे प्रमाण कमी झाले का.? एखादा गुन्हेगार किंवा आरोपीचा कुठल्याही कारणाने मृत्यू झाला, तर त्याच्यावर चालू असलेला खटला आपोआप रद्दबातल होऊन जातो. कारण, तपास व खटला चालवून त्याला कुठले कोर्ट वा कायदा शिक्षाच देऊ शकत नसते. मग तसाच खटला चालवून मृताला तरी न्याय मिळाला म्हणजे काय?
‘अंकिता’ला म्हणूनच न्याय मिळाला असे म्हणणे वा समजणे, ही आपण आपलीच करून घेतलेली फसगत आहे. त्यापेक्षा एक मोठा गुन्हा या दोन वर्षांत घडला आहे. ज्याने महाभयंकर प्रकार केला त्याला मात्र कायद्याच्या सर्व सवलती या कालखंडात मिळाल्या आणि त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध झाल्यावरही कायदा त्यांना शिक्षा देण्यात तोकडा पडला, हे आजचे निखळ सत्य आहे.
दिल्लीच्या निर्भया प्रकरणात देखील हेच घडले.
‘निर्भया’ला न्याय मिळावा म्हणून सात आठ वर्षांपूर्वी आंदोलन पेटलेले होते आणि नव्याने अशा गुन्ह्यांना हाताळण्यासाठी कायदाही करण्यात आला. त्यायोगे अशा प्रकरणांना जलदगती न्यायालयात घेऊन जावे, अशीही तरतूद करण्यात आली. त्याप्रमाणे निकालही ‘लवकर’ लागला. पण, त्यानुसार आरोपींना शिक्षा देण्यात मात्र पोरखेळ होऊन गेला. त्यातून नुसती न्यायाची विटंबना झालेली नाही, तर ‘जलदगती’ या शब्दाचीही विटंबना होऊन गेली आहे. न्याय किंवा अन्याय, गुन्हा किंवा गुन्हेगारी अशा शब्दांनाही अर्थ उरलेला नाही. म्हणून तर इतकी भयंकर घटना घडून व इतका मोठा जनक्षोभ होऊनही, तशा गुन्ह्यांना पायबंद घातला जाऊ शकलेला नाही. मग न्याय कसला व कोणाचा?
अंकीता जळीत प्रकरणावर न्यायालयाच्या निर्णयावर अंकिताच्या आईलने जी प्रतिक्रिया दिली ती अतिशय बोलकी आहे’ माझ्या मुलीच्या दोषीला फाशीच व्हायला हवी होती, ”आम्हाला न्याय मिळाला पण तो अर्धवट मिळाला. दोषीला फाशीची शिक्षा व्हायला हवी”, असं पीडितेच्या आईने म्हटले आहे. ”आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. दोषीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पुढच्या कोर्टात जायचं की नाही, हे आम्ही ठरवू”, असे तिच्या वडिलांनी म्हटले आहे.
एक गोष्ट साफ आहे, ‘ अंकिता’ हयात नाही. त्यामुळे तिला न्याय मिळण्याचा विषयच नव्हता. मुद्दा गुन्हेगाराला शिक्षा देण्याचा होता. ती शिक्षा कोणती व कशाला असते? तर शिक्षेच्या भयाने कायद्याचा धाक निर्माण व्हावा आणि अशा गुन्हेगारीला पायबंद घातला जावा. तो घातला गेला आहे काय? उलट अशा प्रकारचे सामूहिक बलात्कार व महिलाविषयक गुन्हे आणखी अनेकपटींनी वाढलेले आहेत. ते कशाला वाढू शकले? त्याचे खापर पोलीस व शासकीय यंत्रणेवर फोडले जाते. आताही या प्रकरणी आरोपीला जन्मठेप झाली पण त्यामुळे तसे गुन्हे करणारे थांबले नाहीत वा महिलांना कायदा व्यवस्था सुरक्षा देऊ शकलेली नाही.
अंकिता असो की ‘निर्भया’ असो किंवा तिच्यासारख्या बलात्काराला बळी पडणार्या शेकडो मुली-महिलांची समस्या गुन्हेगार नसून, कायद्याचा नेभळटपणा व त्यातली गुंतागुंत हा खरा आरोपी झाला आहे. तांत्रिक व्याधींनी न्याय व्यवस्था व कायदा ग्रासलेला आहे. न्याय आणि कायद्याच्या चुकीच्या कल्पनांनी गुन्हेगारांना प्रोत्साहन दिलेले आहे. कायद्याची सक्ती तो मोडणार्यांना असली पाहिजे. समाजातील १०० लोकांमध्ये एखाद दुसरा वाट वाकडी करणारा असतो. त्याला मार्गावर आणण्यासाठी ‘कायदा’ नावाची सक्ती असते. त्यातली सक्तीच काढून टाकली तर कायद्याला अर्थ उरत नाही. चाकूसुरीला धारच नसेल, तर त्याचा धाक कोणाला वाटू शकतो? कशाला वाटेल? फौजदारी न्याय हा गुन्हा करणार्याच्या मनाचा थरकाप उडवण्यासाठीच असतो. त्या न्यायातून होणार्या शिक्षेची कल्पना मनात आली तरी आपली खैर नाही, अशी भीती निर्माण करण्यासाठी शिक्षा असते.त्या शिक्षेचा धाकच नसेल तर कोणी कायद्याला वा न्यायाला घाबरावे तरी कशाला?
काय घडले होते.?
पीडिता हिंगणघाटच्या स्व. आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. यामध्ये पीडिता ३ फेब्रुवारीला २०२० ला सकाळी तिच्या गावाहून बसने हिंगणघाटला पोहोचली. नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने जाताना आरोपी विकेश नगराळे दबा धरुन बसला होता. पीडिता दिसताच विकेशने अगोदरच दुचाकीतील काढलेले पेट्रोल तिच्यावर ओतले आणि तिला पेटवले. यात गंभीररित्या जळालेल्या पीडितीचा नागपूरातील ऑरेंजसिटी रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता.
९५६१५९४३०६