व्हँलेंटाईचा नाद सोडा;संस्कृती जोपासा
व्हँलेंटाईचा नाद सोडा;संस्कृती जोपासा…
आज तरुणाई अगदी भटकल्यासारखी दिसते.त्यांना दिशा माहीत नसल्याने ती मंडळी या तरुणाईत तरुणाईला सर्वस्व मानुन हवी तशी वागत असते.त्यामुळे तरुणाईत ही मंडळी नेहमीच फसतात.
पुर्वी हँलेंटाईनचा दिवस म्हणजे प्रेमाचा दिवस म्हणून लोकं साजरा करायचे.भारतात ही प्रथा नव्हती.ती इंग्रजांपासून आली.हा दिवस साजरा करतांना तरुण तरुणीला लाल गुलाब बक्षीस द्यायचा.त्यानंतर तीही राग न मानता तो गुलाब स्विकार करायची आणि आपल्या केसात माळायची.प्रेमाचा इजहार करण्याचा तो प्रकार…..हँलेंटाईन डे म्हणुन प्रसिद्ध झाला.
आज व्हँलेंटाईन डे लोकांच्या मनामनात शिरला आहे.लहानगी मुलेही व्हँलेंटाईन डेला आपल्या लहानशा प्रेयसीला फुल देतात.हसतात.ती हसली की समजायचं तिनं प्रेमाचा स्विकार केला.असा हा डे सर्वानाच प्रिय ठरत आहे.पण व्हँलेंटाईन साजरा करतांना थोडा विचार नक्कीच करावा.
व्हँलेंटाईन हा सैनिक होता.तो रोमला राहात होता.तसेच त्यावेळी तिथे क्वाँडीयस दुसरा नावाचा राजा राज्य करीत होता.त्याच्या राज्यात फतवा होता की सैनिकाने कोणत्याच मुलीवर प्रेम करु नये.किंवा अविवाहित पुरुषच उत्तम सैनिक बनु शकतात.म्हणुन तरुणांनी विवाह करुच नये.प्रेमही करु नये. जर प्रेम केलेच तर त्याला मृत्यूदंड दिला जाईल.पण व्हँलेंटाईन याने या तरुणांचे लपुनछपून विवाह करणे सुरु केल्याने माहीत होताच राजाने त्याला तुरुंगात टाकले.पण तिथेही व्हँलेंटाईन चुप बसला नाही.तिथे जेकोबस नावाच्या तुरुंगाधिरा-याच्या मुलीवर तो प्रेम करु लागला.ती आंधळी होती.पण तरीही प्रेमाला त्या राज्यात थारा नसल्याने त्याला राज्याने मृत्युदंड दिला.पण त्यानंतर लोकं स्वस्थ बसले नाहीत.तर त्यांनी व्हँलेंटाईनचा पुतळा उभा करुन त्या पुतळ्यासमोर ते प्रेमविवाह करु लागले.हा व्हँलेंटाईन नावाचा माणुस त्यांच्यासाठी वरदान ठरला.
विदेशात हा उत्सव सात दिवस चालतो.रोज डे,प्रपोज डे,चाकलेट डे,टेडी डे,प्रामीश डे,हग डे,किस डे आणि सर्वात शेवटी व्हँलेंटाईन डे.या दिवशी चांगले स्वच्छ कपडे तरुण तरुणी परिधान करुन एकमेकांना भेटायला येतात.काही फक्त प्रेमाचं प्रतिक म्हणुन गुलाब देतात.नंतर नाश्ता चारुन प्रेयसीला मोकळे करतात.हे तेवढं बरोबर आहे.पण काही याही पलिकडचे आहेत.ते मात्र प्रेयसीला चांगले कपडे परिधान करायला लावतात.भेटायला बोलावतात.मग दोनचार गर्भनिरोधक गोळ्या खिशात टाकतात.जसे की ते हनीमुनलाच चालले.हो,त्यांचं ते हनीमुनच असतं.प्रेयसीलाही ते मंजूरच असतं.मग जेव्हा ते भेटतात.तेव्हा चक्क बाईकवर स्वार होत त्यांची परियंती मोठ्या उच्चभ्रु हाटेलात होते.यात ते आपल्या सा-या तरुणपणाच्या इच्छा व्हँलेंटाईनच्या रुपाने साज-या करतात.परत सायंकाळी मायबाप ओरडायला नको म्हणुन घरी येतात.मायबापांनाही माहीत नसतं की मुलगी व्हँलेंटाईनला फिरायला कोणाबरोबर गेली.वा व्हँलेंटाईन डे म्हणजे कोणता डे?या दिवशी काय करायचं असतं?यातच कधीकधी गर्भनिरोधक गोळ्या काम करीत नाही आणि गर्भ राहतो.मग ज्याचा गर्भ राहतो तो मुलगा नकार देत तिच्यापासून दूर निघुन जातो.तो एवढा दूर निघून जातो की त्या गर्भाच्या गर्भपातापर्यंतच्या वेदना फक्त त्या तरुणीलाच झेलाव्या लागतात.
महत्वाचं म्हणजे व्हँलेंटाईन नावाचा संत.त्याने प्रेमींना प्रेम करायचा संदेश अवश्य दिला आहे हे मानणे ठीक आहे.पण त्याने लग्नापुर्वीच आपल्या प्रेमाच्या नशेत आपल्या कामवासना पुर्ण करा हा संदेश दिलेला नाही.तरीही आम्ही असे का वागतो?हे कळत नाही.आजचा युवक प्रेमाच्या नावावर प्रेयसीला जलवा दाखवतांना रंगीबेरंगी बाईक घेतात.त्यांचे वेगवेगळे स्टंट प्रेयसी प्रसन्न व्हावी म्हणुन दाखवितात.नव्हे तर प्रेयसीला गाडीवर बसवून गाड्या भरधाव वेगाने चालवतात.त्यातच प्रेयसी गाडीवरुन केव्हा खाली पडते?केव्हा त्याचा अपघात होतो?हे देखील त्याला समजत नाही.त्यातच काही तरुण याहीपलिकडचे……ते तर प्रेयसीला चांगलं वाटावं म्हणुन तिच्या समोरच सिगारेटचे झुरके घेतात.पण त्यापासून पुढे आपल्यालाच यापासून कँन्सर होईल याची त्यांना जाणीव वा तमा नसते.
विशेषतः आमची भारतीय संस्कृती एवढी महान असतांना आम्ही या विदेशी संस्कृतीच्या फंदात पडून त्यांच्याही संस्कृतीला बदनाम करण्याची गरज नाही.निव्वळ आपल्या इच्छा पुर्ण करण्यासाठी आम्ही व्हँलेंटाईन मानतो.खरं तर प्रेम करतांना त्याला काळ,वेळ,स्थळ याची आवश्यकता नसते.ते प्रेम केव्हाही होते.त्यासाठी व्हँलेंटाईन डे ची आवश्यकता नाही.तसा पुर्वी भारतात व्हँलेंटाईनचा गंधही नसतांना प्रेम झाले नाही काय?क्रिष्ण राधेचं प्रेम,मीरा क्रिष्णाचं प्रेम,जोधा अकबरचं प्रेम,सलीम नूरजहाँचं प्रेम……ह्या प्रेमकथा भारतातच घडल्या ना.तरीही आम्ही आजही नाद करीत व्हँलेंटाईन डे साजरा करतो.आपली संस्कृती विसरतो आणि मग फसतो.मुळात व्हँलेंटाईन डे जर तुम्ही पाळता आहात तर एक लक्षात ठेवा.या व्हँलेंटाईनने नियमाला अव्हेरुन प्रेमविरांचं लपुनछपून लग्न लावलं एवढंच नाही तर आंधळ्या जेकोबसशी प्रेम केलं.पण आजच्या तरुणांना सुंदर मुलगी हवी.आंधळी नको.
दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आजचा धंदेवालेही याच दिवसाचा फायदा घेवून गुलाबाच्या फुलाची किंमत वाढवतात.तसेच नाश्तादुकान,लाज,यांचेही दर वाढलेले असतात.ते लुटलुट लुटतात या प्रेमविरांना.महत्वाची गोष्ट अशी की हा दिवस याच दिवशी व्हँलेंटाईन दिवस आहे की लुटमार दिवस आहे ते कळत नाही.तरीही आम्ही साजरा करतो.सर्व विसरुन.मुलीही दिमाखानं प्रेमविरांना भेटायला जातात आणि त्यांच्या जाळ्यात फसून आपलं अवसान गाळुन बसतात.हे काही बरोबर नाही.जी फुले देवाला चढायला हवी.ती फुले अनैतिक कृत्य करणा-या मुलामुलींच्या हातात असतात.नव्हे तर त्यातून धोके मिळताच त्यांच्या शवावर.१४ फेब्रुवारी व्हँलेंटाईनचा स्मृतीदिन अवश्य साजरा करा.पण एक लक्षातही असू द्या.आम्ही भारतीय आहो.आमची संस्कृतीही भारतीय आहे.ज्या संस्कृतीत लग्नापुर्वी कामवासनेला जागा नाही.
अंकुश शिंगाडे
९३७३३५९४५०,९९२३७४७४९२
©®©