डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन छत्रवृत्तीच्या सरसकट मागणीसाठी तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच

डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन छात्रवृत्तीच्या सरसकट मागणीसाठी तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच
डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय छत्रवृत्ती २०१९ व २०२० च्या सरसकट मागणीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथे करण्यात येत असलेले आमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मार्फत उच्य शिक्षणातील संशोधनाला चालना देण्यासाठी बार्टी मार्फत २०१३ पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन छात्रवृत्ती सुरु करण्यात आली.याच धर्तीवर २०१८पासून ओबीसीसाठी महाज्योती तर मराठा समाजासाठी सारथी या संस्थेची स्थापना करण्यात आली.या तीनही संस्थांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अर्थसहाय्य देण्यात येते. यात सारथीने ५५१ विद्यार्थ्यांना परीक्षा,मुलाखत न घेता केवळ अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या पडताळणीवर सरसकट छात्रवृत्ती दिली त्याच प्रमाणे महाज्योतिनेही केवळ कागदपत्राच्या पडताळणीवर सरकट छात्रवृत्ती दिली. मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीने लेखी परीक्षा ,मुलाखत कागदपत्र पडताळणी ही तंत्रे राबवून २०१९ च्या २०० व २०२० च्या २०० याप्रमाणे केवळ ४०० विद्यार्थ्यांची निवड केली.यासाठी राज्यभरातून ५१७ अर्ज प्राप्त झाले होते. तर लेखी परीक्षा व मुलाखतीस ५०९ विद्यार्थी पात्र ठरले.मात्र बार्टीने निवड केवळ ४०० विद्यार्थ्यांना छात्रवृत्ती घोषित केली.उर्वरित १०९ विद्यार्थ्यांनाही बार्टी ,सारथी प्रमाणे सरसकट छात्रवृत्ती देण्यात यावी यासाठी दिनांक १६ फेब्रुवारी पासून विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. पुणे येथे बार्टी कार्यालयसमोर सुरु असलेल्या या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून जोपर्यंत सकारत्मक मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.यात जयवर्धन गच्चे,अनुपम सोनाळे,सदानंद गायकवाड,गंगाधर गायकवाड, ही विद्यार्थी उपोषण करत आहेत तर राज्यातील विविध विद्यापीठातील विद्यार्थी या उपोषणाच्या समर्थनार्थ उपस्थित होताना दिसत आहेत.