ग्रामपंचायत कार्यालय कमळवेल्ली येथे शिवजयंती साजरी
ग्रामपंचायत कार्यालय कमळवेल्ली येथे शिवजयंती साजरी
महाराजांच्या कार्याचे स्मरण व नमन
सुनील शिरपुरे/ झरीजामणी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिव जयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते. महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा ज्योतीराव फुले यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ असा एक पोवाडा लिहिला. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली. जी पहिली शिवजयंती होती आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. त्याच अनुषंगाने ग्राम पंचायत कार्यालय कमळवेल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला नमन व स्मरण करण्याच्या हेतुने शिवजयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम सरपंच पुष्पाबाई चुक्कलवार यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर उपसरपंच श्री वामन हलवेले, ग्रामसेवक पी.एन.बद्दमवार व उपस्थितांनी पुजन केले. या कार्यक्रमाला सरपंच श्रीमती पुष्पाबाई चुक्कलवार, उपसरपंच वामन हलवेले, ग्रामसेवक पी.एन बद्दमवार सर, सदस्य गणेश नुगुरवार, महेश गेडाम, शिपाई मोहन शिरपुरे, पाणी पुरवठा कर्मचारी शेख जमाल, प्रतिष्ठित व्यक्ती राजेश येलचेलवार, प्रविणभाऊ चुक्कलवार, युवा कार्यकर्ते अमोल ठाकरे, धनराज सिडाम, हुशार मडावी, खुशाल गेडाम व अन्य नागरिक उपस्थित होते.