नसोसवायफच्या नेतृत्वाने उर्वरित १०९ विद्यार्थ्यांना बार्टीची फेलोशीफ; पुणे येथे आमरण उपोषणास बसलेल्या विद्यार्थ्यांची मागणी मान्य
नसोसवायफच्या नेतृत्वाने उर्वरित १०९ विद्यार्थ्यांना बार्टीची फेलोशीफ; पुणे येथे आमरण उपोषणास बसलेल्या विद्यार्थ्यांची मागणी मान्य
पुणे:
डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था बार्टी पुणे येथे सरसकट फेलोशिफच्या मागणीसाठी नसोसवायफच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या उपोषणास अखेरीस यश प्राप्त झाले असून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे उर्वरित १०९ विद्यार्थ्यांना फेलोशिफ देण्याचे कळवल्याने
राज्यभरातील त्या विद्यार्थ्यांच्या फेलोशीफचा मार्ग मोकळा झाला आहे.
नॅशनल एसी एस टी ओबीसी स्टूडेंट अँड युथ फ्रंटने डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन फेलोशीफ ही.सारथी, महाज्योतीच्या धर्तीवर सरकट फेलोशीफ देण्यात यावी यासाठी सुरुवातीपासूनच
बार्टी व सामाजिक न्याय विभागास वेळोवेळी निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली होती पण,;बार्टीने २०१९ व २०२०या प्रती वर्ष २०० याप्रमाणे २०२१ च्या काळात जाहिरात काढून लेखी,परीक्षा,मुलाखत यासारख्या जाचक अटी व नियम पाळत केवळ ४००विद्यार्थ्यांची निवड केली.मात्र नसोसवायफने
फेलोशिफसाठी अर्ज केलेल्या ५०९ विद्यार्थ्यांना फेलोशिफ देण्याची मागणी सामाजिक न्याय मंत्र्याकडे लावून धरली होती;पण या मागणीकडे कानाडोळा करून प्रतिवर्षी २००प्रमाणे दोन वर्षाच्या ४००विद्यार्थ्यांची निवड केली.या विरोधात नसोसवायफच्या नेतृत्वाखाली दिनांक १७ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते.दरम्यान बार्टीने १८फेब्रुवारी रोजी बार्टीच्या संचालकांनी सामाजिक न्याय मंत्र्याकडे उर्वरित १०९ विद्यार्थ्यांना फेलोशिफ दोन दिवसात जाहीर होईल असे आश्वासन दिले होते.तेव्हा आंदोलन मागे घेतले होते.पण बार्टीकडून दोन दिवसात कुठलाही निर्णय आलेला नसल्याने पुन्हा नसोसवायफच्या नेतृत्वात २८फेब्रुवारी पासून विद्यार्थी बेमुदत आमरण उपोषणास बसले होते. त्यामुळे याची दखल घेत दिनांक १ मार्च २०२२ रोजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे उर्वरित १०९ विद्यार्थ्यांना फेलोशिफ देण्याचा निर्णय मंत्रिंडळात झाल्याचे ट्विटद्वारे
कळवले.यानंतर बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी झालेल्या निर्णयाची एक प्रत विद्यार्थ्यांना देऊन
येत्या आठ दिवसात बार्टी संकेतस्थळावर निवड यादी घोषित करणार असल्याचे कळवल्याने अखेरीस त्या १०९ विद्यार्थ्यांच्या फेलोशीफचा मार्ग मोकळा झाला आहे.नसोसवायफचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.हर्षवर्धन दवणे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या उपोषणाची दखल राज्याच्या सामाजिक न्याय विभाग व बार्टीने घेतली आहे. आमरण उपोषणात जयवर्धन गच्चे ,अनुपम सोनाळे ,सदानंद गायकवाड, शितल नांगरे, गंगाधर गायकवाड हे विद्यार्थी होते . उपोषणास बसून हक्काचा लढा यशस्वी केलेल्या विद्यार्थ्यांचे नसोसवायफचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन दवणे यांनी उपोषणास बसलेल्या विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले तसेच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे , बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांचेही
आभार व्यक्त केले नसोसवायफचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाला विद्यार्थ्यांनी यशात रुपांतरीत करत या आंदोलनाचा लढा लढल्याने राज्य राज्यभरातील विद्यार्थ्यांनी हर्षवर्धन दवणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.