तंत्र मंत्र साधना याला जबाबदार कोण?
तंत्र मंत्र साधना याला जबाबदार कोण?
तंत्र मंत्र साधना याला जबाबदार आपणच आहोत. कारण आपणच त्या तंत्रामंत्रासारख्या गोष्टींना खतपाणी घालत असतो. उदा. एखाद्या मुलीची मासीक पाळी येत नसेल किंवा त्यात बदल झाला असेल, तर त्याला तंत्र मंत्राचा हवाला देत त्यात तांत्रीक मंडळी अशी औषधी त्या स्रीला खायला देतात की ज्यातून तिची मासीक पाळी सुरु होते. त्यातून ते सर्व काम तंत्र मंत्रानं झालं असं दाखवलं जातं. एखाद्या स्रीला पुत्र होत नसल्यास तिला अशी औषधी खावू घातली जाते. ज्यातून तिला अपत्यप्राप्ती होते. नाव मात्र तंत्र मंत्रांचं केलं जाते. एखाद्या वेळी साधी मांजर आडवी गेल्यास वा कुत्रा आडवा गेल्यास…….त्यानंतर एखाद्याचं काम बिघडल्यास त्यामध्ये ती मांजर वा कुत्रं आडवं गेल्यानं ते कामं बिघडलं असं दर्शवलं जातं. त्यातूनच अंधश्रद्धा, तंत्र मंत्र याची निर्मीती होते.
तंत्र मंत्र आणि अंधश्रद्धेचा संबंध प्राण्यांशीही लावला जातो. जसे घुबडाचे ओरडणे, कावळा ओरडणे, साप दिसणे, साप सप्नात दिसणे, मुंगूस दिसणे, मुंगूस स्वप्नात दिसणे. त्यातच काही काही स्वप्नांचा अर्थही काढला जातो. तो अर्थ म्हणजे स्वप्नात मृत्यू दिसणे, स्वप्नात लग्न दिसणे, स्वप्नात पूर दिसणे इत्यादी.
आज जग पाश्चात्य संस्कृतीकडे सरकत असतांना लोकं अजुनही यु ट्यूबच्या माध्यमातून तंत्र मंत्र अंधश्रद्धा पसरवीत असतात. ज्या गोष्टी संसारात नाहीत. गुप्तधन मिळतं म्हणून ते काढण्यासाठी नराचाच बळी लागतो ही गोष्ट विचारात घेवून कित्येक लोकांनी ते गुुप्त धन मिळविण्यासाठी कित्येक नवजात बालकांचे अपहरण केले व त्यांचा बळी दिला. परंतू अजुनही अशी बरीच प्रकरणे आहेत की ज्यात त्या नरबळींचा सुगावा लागलेला नाही. फक्त एखादं प्रकरणंच तेवढं उजेडात येतं.
विशेष सांगायचं म्हणजे आज पाश्चात्य संस्कृतीतून सुधारलेली जनसंख्या पुढे या संस्कृतीनं चंद्र, सुर्य देव नाहीत हेही सिद्ध केलेलं असतांना असल्या अंधश्रद्धा व तंत्र मंत्रांना खतपाणी का? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. ही यु ट्यूब चैनलं तसेच या दूरदर्शन वरील वाहिण्या अशा अंधश्रद्धेचं का प्रसारण करतात तेही कळत नाही. एक तर चंद्र, सुर्याला देव मानावे ती वस्तूरुपं नाहीत तर मानवरुपं आहेत हे मानावे. मग ती अंधश्रद्धा असो की नसो. मग कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीसाठी नरबळी दिला तरी चालेल. अन् ते नरबळी देवूनही फायदा नाही झाला तरी चालेल.
आज अशी बरीचशी प्रकरणं आहेत की अंधश्रद्धा त्यात मानली जातेच. लोकं लपूनचोरुन कोंबड्याच्या झुंजी लढवतात. त्यात कोंबडा जिंकायला हवा म्हणून तंत्रा मंत्राचा आधार घेतला जातो. खरंच तंत्रा मंत्रानं कोंबडा जिंकू शकतो काय? याचं उत्तर नाही असलं तरी लोकं ऐकायला तयार होतात का? तर त्याचंही उत्तर नाही असंच आहे.
तंत्र मंत्र अंधश्रद्धेला आपला समाजच जबाबदार असून त्याच तंत्रामंत्राच्या आधारे आज जग परीवर्तनाकडे वळलेला असतांनाही आपला देश अजुनही तंत्र मंत्र यात गुरफटलेला आहे.
विशेष सांगायचं म्हणजे मुळात तंत्र, मंत्र आणि अंधविश्वास नाहीच. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. ठेवायला सांगूही नये. तसेच कोणत्याही स्वरुपाची नैसर्गीक व अनैसर्गीक अंधश्रद्धा पसरवू नये. हे तेवढंच खरं आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०