संस्कृती

स्त्री अस्तित्व;स्त्री परुषांनी कसं असावं..

 

  स्त्री अस्तित्व; स्त्री परुषांनी कसं असावं…

 

स्री अस्तित्व. स्रीयांना अनादीकालापासून गुलामच समजले जाते. आजही गुलाम समजतात लोकं तिला. कारण काही स्रियांचा स्वभाव.
स्री ही हुशार आहे. बलशाली आहे. ती पुरुषांना मदत करते. त्याचबरोबर तिनं जर मनात आणलं तर ती काली आणि दुर्गेचेही रुप घेवू शकते. परंतू ती भावनाशील आणि दयाळू असल्यामुळे पुरुषांना दुय्यम स्थान न देता स्वतः दुय्यम स्थान घेते नव्हे तर पुरुषांच्या गुलामगीरीत वागते. समजदार असलेली स्री. ती स्वतःचं दुय्यम स्थान घेवून वागायला लागते, तेव्हा तिला लोकं ती दुर्बल नसूनही तिला दुर्बल समजून तिच्यावर अत्याचार करीत असतात. त्या अत्याचारात तिची छेडखाणी करणे, बलत्कार करणे, तिचे विचार दडपणे, तिला धाकात ठेवणे. जशी ती विवाह करुन घरात आली नाही, तर एक दासी म्हणून तिला विकत आणलं आणि जेव्हा हीच महिला रणचंडीकेचं अवतार धारण करते, तेव्हा मात्र ती इतरांना रणचंडीका वाटत नाही. ते तिला शूरही समजत नाहीत. तर तिला दुषणे देतात. म्हणतात की ती वेश्या आहे. (वेश्या……. याठिकाणी अर्थ शैतानी वृत्तीची, निर्भीड वृत्तीची. परंतू ती निर्भीड वृत्ती लोकांना मान्य नसल्यानं तिला शिव्या देत असतांना वेश्या संबोधलं जातं) ती अमूक आहे, तमूक आहे.
मुळात स्री जातीची ही कारणमिमांसा. कधी हेळसांड तर कधी तिची स्तूती. स्तूतीपेक्षा हेळसांडच जास्त असते स्रीजातीची.
स्री ही आधीपासूनच बलवान. ती पुर्वीही पुत्रप्राप्त करायची. तसेच त्यांचं पालनपोषण तर करायची. व्यतिरीक्त घरीही पुरुषांपेक्षा जास्त काम करायची. आजही असं चित्र दिसतं की स्री ही मुलांना जन्म तर देते. त्याचे पालनपोषणही करते व आपल्या पतीचंही पालनपोषण करते. अर्थात आजकालचे पती हे कामच करीत नाहीत असे म्हटल्यास आतिशयोत्ती होणार नाही.
पतीची व्याख्या करायची झाल्यास पती हा सुखसमृद्धी देणारा असावा. त्याने पत्नीला दुःखी कष्टी करु नये. तसेच पत्नीची सेवा करावी. पत्नीच्या इच्छा पूर्ण करणारा असावा. पत्नीच्या भावभावना समजणारा असावा. पत्नीशी मैत्रीपुर्ण व्यवहार करणारा असावा. तिच्या विचारांचा आदर करणारा असावा. तिचा मानसन्मान करणारा असावा. परंतू पती तसा राहात नाही. तो कधीच पत्नी म्हणून स्रीजातीला समजून घेत नाही. आपण जसे तिच्याशी विवाह करुन उपकारच केले असे दर्शवतो. तशाच आविर्भावात तो वागतो.
पतीबाबत सांगायचं झाल्यास काही पती निश्चीतच कामाला जातात. ते दिवसभर काम केल्यानंतर घरी थकून भागून जेव्हा येतात. तेव्हा त्यांच्या हातात पाण्यानं भरलेला ग्लास तसेच हाताहातात ताटंही त्याच्या पत्नीला द्यावा लागतो. सकाळी झोपेतून उठल्यावर मंजनपासून तसेच अांघोळीच्या पाण्यापासून तर जेवनाच्या ताटापर्यंत व पुढे डब्यापर्यंतही पत्नीला राबावं लागतं. त्यातही त्याच्या दारु पिण्याचा त्रास सहन करावा लागतो. काही काही पती तर पत्नी असूनही दुसरी पत्नी ठेवतात.
पत्नी घरी जरी राहात असली, तरी ती पुरुष असणा-या आपल्या पतीसाठी राब राब राबते. तरीही पती म्हणतो, ‘घरी कोणतं काम असतं. कोणतंच नाही.’ सगळं आयतं. परंतू पत्नीची गोष्ट घेतल्यास पत्नी जर कामाला जात असेल, तर तिला सायंकाळी घरी येताच कोणीच पाणी देत नाही. कोणीच साधा चहा करुन देत नाही. कोणीच तिची ती थकलेली अवस्था पाहूनही तिला सहारा देत नाही. तिला कामावरुनही आल्यावर घरी चुलीत अन्न शिजविण्यासाठी शिरावंच लागतं ही शोकांतिका आहे नव्हे तर वस्तुस्थीती.
आज बरीचशी अशी माणसं आहेत की जी पती बनण्याच्या लायकीची नाहीत. ते विवाह तर करतात. फक्त शारिरीक संबंध पूर्ण करुन घेण्यासाठी. परंतू शारिरीक संबंधापुर्वीही दुस-या ब-याच गोष्टी असतात. ज्या स्री पूर्ण करते. परंतू पुरुष ते सर्व विसरुन स्रीला उपभोग्य वस्तू मानते.
आज देशातील संस्कृती लोप पावत चललेली असतांना व पाश्चात्य वारे देशात वाहात असतांना काही लोकं पाश्चात्यांचं अनुकरण करतात. करायला हवे. त्यानुसार काही काही महिलाही पुरुषांना केरकचराच समजतात. त्या पुरातन आपल्या भारतीय संस्कृतीला दोष देतात. ते बरोबर आहे. कारण या पुरातन संस्कृतीनं स्रीयांना उपभोग्य वस्तूच मानले आहे. तिची संपती ही पुरुषाची असल्याचं सांगीतलं आहे. हे मनुस्मृतीत लिहिलेलं विधान. पुरुषांनी पुरातन संस्कृतीचं अंधानुकरण करुन खुपच अतिरेक केला. त्यासाठीच लोकांनी पाश्चात्य संस्कृती स्विकारली. त्यातूनच पुरातन संस्कृतीतील पूर्ण गोष्टी पूर्ण स्वरुपात समाप्त केल्या गेल्या. परंतू पुरातन संस्कृतीबाबत सांगायचं झाल्यास जे नियम स्री जातीला गुलाम बनविणारे होते, ते समाप्त करायला हवे होते. काही प्रथाही. जसे. पती मरणानंतर पत्नीचे सती जाणे, पांढरी साडी वापरणे, केसकर्तन करणे, सिंदूर मिटविणे, बांगड्या फोडणे. इत्यादी प्रथा नक्कीच बंद करायला हव्या होत्या. मानमरातब नाही. कारण या घातक प्रथा होत्या स्रीजातीला दासत्वाचं जीवन जाणूनबुजून जगायला लावण्यासाठी. परंतू जगानं पाश्चात्य दृष्टिकोण स्विकारतांना पांढरी साडी घालणे, सिंदूर मिटविणे, बांगड्या फोडणे ह्या प्रथा आजही सुरु ठेवल्या. तसेच पूर्वी ज्या स्रीया जेष्ठ वडीलधारी माणसांचा आदर करायचे. तो आदरही पाश्चात्य संस्कृतीच्या हव्यासानं बंद केला. आज स्नुषा म्हणून घरात येणारी मुलगी आपली पुरातन संस्कृती, ज्या संस्कृतीत मानमरातब आहे. ती सोडून पाश्चात्यांचं अनुकरण करुन सासूला अती त्रास देते. हे योग्य नाही. पुर्वी सासू त्रास देत होती. आज स्नुषा त्रास देते.
८ मार्च, जागतिक महिला दिवस. याबद्दल विशेष सांगायचं म्हणजे महिलांनी अवश्य पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करावं. करायलाच पाहिजे. जुन्या प्रथा वाईट आहेत. त्या सोडायलाच पाहिजे. याचा अर्थ असा नाही की त्यांनी जुन्या प्रथांसोबत मानमरातब सोडावा. वडीलधारी मंडळींना केरकचरा समजून त्यांचे वाभाडे काढावे. पतीचीही इज्जत त्या सडक्या पाश्चात्य संस्कृतीच्या वा-यानं रस्त्यावर काढावी. तसेच याच पाश्चात्य संस्कृतीच्या नादी लागून कोणत्याही स्रीनं प्रत्येक रात्री कसीनोमध्ये जुवा खेळून पती बदलवू नये. ती आपली संस्कृती नाही. तसेच कोणत्याही स्रीनं जुन्या संस्कृतीनुसार पतीला परमेश्वर मानून डोक्यावर बसवू नये. तेही बरोबर नाही. तसेच पतीनंही स्रीला गुलाम समजू नये. तिला योग्य वागणूक द्यावी. हेच आज महिला दिनी सांगणं आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button