ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची कॉलर पकडल्याने ;दोषींवर कार्यवाही करण्याची संघटनेची मागणी

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची कॉलर पकडल्याने ;दोषींवर कार्यवाही करण्याची संघटनेची मागणी
सुनील शिरपुरे/ झरीजामणी
झरीजामणी तालुक्यातील खरबडा ग्रामपंचायत ही गट ग्रामपंचायत असून त्यात बिरसाईपेठ, चालबर्डी व रायपूर ही गावे समाविष्ट आहेत. सध्या शासनाच्या घरकुल योजना अंतर्गत मंजूर घरकुल लाभार्थ्यांच्या सध्याच्या घराची मोका पाहणी सुरू आहे. त्या करीता प्रशासक निकोडे साहेब, ग्रामसेवक श्री.किरण चांदेकर व ग्रामपंचायत कर्मचारी.भुमारेड्डी नागोराव बद्दमवार ही टीम रायपूर येथे गेले. लाभार्थी महेश वासुदेव टेकाम राहणार रायपूर यांच्या घराची पाहणी करत असता संबंधीत टीम ला लाभार्थ्यांचे घर पक्के सिमेंट विटाचे आढळून आले. त्यामुळे पंचायत समितीचे अधिकारी वरील लाभार्थ्यांचे पक्के घर असल्याने प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास नकार दिले. यावेळी फक्त लाभार्थ्यांची पत्नी हजर होती. पत्नीने आपल्या पतीस घडलेली आपबिती फोनद्वारे कळविले. त्यामुळे राग अनावर झालेला लाभार्थी महेश वासुदेव टेकाम हा एक साथीदार घेऊन सरळ पंचायत समिती गाठले व पहाणी केलेल्या तिघांनाही शिवीगाळ केली. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी बद्दमवार यांच्यामुळेच आपला लाभ हुकणार असा संशय बाळगून पंचायत समितीपुढे शुभारेड्डी बद्दमवार यांना एकटे असल्याचे पाहून त्यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली व तुला बघून घेईन अशी धमकीही दिली. तरी दोषींवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी तक्रार पाटण पोलीस स्टेशनला दाखल करत म.रा.ग्रा.पं.कर्म.संघटना शाखा झरीजामणी यांच्या कडून न्यायाची मागणी जोर धरीत आहे. अन्यथा कामबंद आंदोलनाच्या पावित्र्यात ही संघटना आहे. त्यामुळे पाटण पोलीस स्टेशन यावर काय कार्यवाही करेल? याकडे संघटनेचे लक्ष लागले आहे.