मदतीची मानसिकता उरलेली नाही..
मदतीची मानसिकता उरलेली नाही..
माणूस जन्माला येतो. त्याचबरोबर तो आपले जीवन जगण्यासाठी जीवन घडवीत असतो. त्यातच तो कधीकधी आवश्यकता पडल्यास इतरांची मदत घेत असतो. कधीकधी इतरांना मदत करीत असतो. परंतू ही मदत करणे जेव्हा अंगावर बेतते. तेव्हा मात्र विचार येतो की आपण अशी मदत करायला नको होती.
मदतीचा गुणधर्म…….. अतिशय चांगला धर्म आहे. परंतू ती मदत कोणाला करावी हेही त्या मदतीतून दिसायला हवं. कधीकधी या मदतीचा गैरफायदा घेतला जातो. एक प्रसंग सांगतो. एक व्यक्ती खानावळीत काम करायचा. त्यातच त्या खानावळीतून तो रात्री अकरालला सुटून आपल्या घरी दूर अंतरावरुन यायचा. परंतू तो कोणाला लिफ्ट द्यायचा नाही. एकदा असाच तो रात्री खानावळीतून सुटल्यावर घरी परत यायला निघाला. तेव्हा वाटेत त्याला एका व्यक्तीनं लिफ्ट मागीतली. त्यातच त्यानं मदत म्हणून त्या व्यक्तीला लिफ्ट दिली. त्या व्यक्तीला लिफ्ट मिळताच तो बोलत चालत त्या व्यक्तीसोबत आला. त्यावेळी त्यानं त्या लिफ्ट देणा-या व्यक्तीकडून त्याची वैयक्तीक बरीच माहिती विचारली. त्यानंही भोळेभाबडेपणानं ती माहिती सांगीतली.
तो व्यक्ती एक पोलिस शिपाही होता. त्यानं आपल्या पोलिस स्टेशन क्षेत्रात पोहोचल्यावर त्या व्यक्तीची गाडी चालान केली. कारण त्याने त्या गाडीवर बसल्यावर त्याच्या गाडीबाबतची पुरेपूर माहिती विचारुन टाकली होती.
असाच दुसरा प्रसंग सांगतो. दोन व्यक्ती हाप मर्डर करुन आले. त्यांनी एका व्यक्तीला लिफ्ट मागीतली. अंधारी ती रात्र. माहिती पडलंच नाही की ते खुन करुन आलेत. त्यानं मदत म्हणून लिफ्ट दिली.. परंतू सगळं विपरीत घडलं. त्या रक्ताचे डाग त्याच्या सीटवर पडले आणि ते रात्री धुतले गेले नसल्यानं सकाळीच पोलिस त्याच्या घरी आले व त्याला घेवून गेले. या दोन्ही प्रकरणात मदत ही अंगावर बेतली.
आज आपण मदत करतो. कोणाला करतो. आंधळ्या, लंगड्या, अपंगाना. खरे अपंग ठीक आहेत. परंतू ज्यांना जाणूनबुजून अपंग बनवलं जातं, त्यांचं काय? आज अशा ब-याच टोळ्या सक्रीय आहेत की जे लहान मुलांचं अपहरण करतात आणि त्यांना अपंग बनवतात. त्यांचे जाणूनबुजून हात पाय कापतात व जबरन भीक्षा मागायला लावतात. तो आलेला भीक्षेचा पैसा त्यांना देत नाही. त्यांना फक्त दोनवेळचं जेवण देतात. तेही अर्धपोटी. परंतू आपल्याला ती वास्तविकता माहित नसल्यानं आपल्याला त्याचा विचारच येत नाही. हे असं का घडतं? याचा कधी आपण विचार केला आहे काय? ही अपहरण झालेली मुलं कोणती? याचा तरी विचार करतो काय? तर याचं उत्तर नाही असंच आहे. आपल्याला समोर ती उघडी नागडी मुलं दिसली की दया दाखवून आपण त्यांना रुपया दोन रुपये देतो. खोलात शिरत नाही. कारण खोलात शिरलोच तर फार दुःख होतं. दुःख झालं तरी ते आपण झेलू शकत नाही. त्यामुळं आपण त्यामध्ये राहू शकत नाही.
एक अजून प्रसंग सांगतो. एका गृहस्थाने आपल्या मेव्हणीला फार मदत केली. तिला एक मुलगीही होती. ती लहान होती. अचानक तिचा पती मरण पावला. त्यानंतर तिला राहावत नव्हतं. शेवटी तिनं लिव्ह इन रिलेशन अंतर्गत काही व्यक्ती पतीसारखे ठेवले. ते व्यक्ती तिच्या मुलीला पसंत नव्हते. म्हणून की काय, ती मुलगी विरोध करीत होती. तसा त्या मुलीचा मोठा बापही. त्यातच ती मुलगी त्या व्यक्तींना काहीबाही बोलायची. तसा तिचा मोठा बापही. त्यालाही वाटायचं की तिनं तसा नाद सोडावा व आपल्या मुलीकडं पाहावं. परंतू ती काही ऐकेना. तसे तिचे काही पती सोडूनही जायचे. परंतू तिला काही फरक पडायचा नाही.
मुलीची इच्छा पाहून त्या मुलीचा मोठा बाप तिच्या आईला बोलायचा.. तसा तो मदतही करायचा. परंतू ते पती सोडून जाताच ती बावचळायची व म्हणायची की तिचा मोठा बापच तिची जिंदगी बरबाद करतोय. म्हणूनच तिचे पती सोडून जातात. शेवटी ही मदतीची मानसिकता. ती त्याला बदनाम करुन गेली. तिनं आपल्या वासनेच्या तृप्तीसाठी आज त्या मुलीलाही सोडलं होतं. ती मुलगी आज मोठ्या वडीलाकडे होती नव्हे तर आनंदानंं जगत होती आणि तिची आई आज सैरावैरा प्रेम मिळविण्यासाठी फिरत होती.
ती मुलगी आज मोठी झाली होती. तिचा विवाहही झाला होता आणि तिची आई एच आय व्ही ग्रस्त झाली होती. तशी एकाकी जीवन जगत होती. आज ती तडफडत होती आपल्या मुलीला भेटण्यासाठी. परंतू तिची मुलगी तिला भेटायचं टाळत होती. तिनं जे कर्म केले होते. त्याची शिक्षा तिला नियतीनं दिली होती. आज तिला मदत करणारे असे कोणीच नव्हते. त्यातच ती पश्चाताप करु करु जगत होती. आज मात्र तिला सारंच आठवत होतं.
मदतीची आज मानसिकता उरलेली नाही. ज्याला आपण मदत करतो. तो व्यक्ती आपलं काही नाव घेत नाही. उलट ज्याला आपण मदत करतो. त्याचा आपल्याला भयंकर त्रास होतो. परंतू नियती ते सगळं पाहात असते. ती नियती काळ सरकताच अशी रौद्र रुप धारण करते. मग त्या नियतीच्या रौद्र रुपातून कोणीही सुटू शकत नाही.
मदत नक्कीच करावी. परंतू ती मदत सर्वांना करु नये. जो त्याचं बलिष्ठान ठेवेल असं तुम्हाला वाटत असेल. त्यालाच मदत करावी. तसं पाहता ते ओळखता येणे कठीण आहे.
मदत ही अनोळखी माणसांना करु नये. ती नक्कीच जीवावर बेतते. जिथे सख्खेच नात्यातले आपण मदत करुनही धोका देतात. तिथे काही लोकं तर पराये व्यक्ती आहेत. आज एक गृहस्थ मी असाही पाहिला की ज्याला कोरोना झाला. परंतू तो मरण पावला नाही. त्याच्या समोर कित्येक माणसं मरण पावली. कोणाला जीवंंतच बेशुद्धावस्थेत गुंडाळलं. कधी आपलाही नंबर लागेल असं त्याला वाटत होतं. परंतू तो वाचला. त्याचं कारण होतं, त्यानं केलेली मदत. त्या ठिकाणी एक डॉक्टर मुलगी होती. जिला शिकायला त्यानं मदत केली होती. म्हणूनच ती डॉक्टर झाली होती.
महत्वपूर्ण गोष्ट ही की माझे जिजू म्हणत, मदत दहा लोकांना करावी. त्यातून दोन जरी आपलं नाव घेत असतील तर ते दहा लोकांना मदत केल्यासारखं होईल. त्यात काय सत्य होतं ते मला माहित नाही. मात्र मी त्यातून एकच शिकलो की शिवरायांना मदत करणारे त्यांचे मावळे आजही इतिहासात अभ्यासले जातात. इतर मंडळी नाही. तसंच सावित्री फुलेंना मदत करणारी फातिमा आजही अभ्यासली जाते, झाशीच्या राणींना मदत करणारी झलकारी बाई आजही इतिहासाच्या पानात दिसते अन् आजही भारतीय स्वाकंत्र्यात मदत करणारे क्रांतीकारक अभ्यासक्रमाच्या पाठ्यक्रमात अग्रपानावर दिसतात हे तेवढंच खरं आहे. मात्र यातून आपल्याला जो बोध घ्यायचा ते आपल्यावर आहे. मी सांगू शकत नाही हे तेवढंच खरं आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०