आंबेडकरांचे भाषण हे पिस्तूलातून सटासट सुटणाऱ्या गोळ्यांप्रमाणे- विव्हल्स निकल्स
आंबेडकरांचे भाषण हे पिस्तूलातून सटासट सुटणाऱ्या गोळ्यांप्रमाणे- विव्हल्स निकल्स
विव्हल निकल्स हा ब्रिटिश पत्रकार, तो पत्रकारांमध्ये पंडित म्हणून त्याचा मान होता. त्याने जवळपास एक वर्षं भारतभर दौरा केला. अगदी बैलगाडीने सुध्दा व प्रसंगी पायी.त्या अभ्यास दौऱ्यातून त्याने एक ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ कुणा भारतीय कद्रु लोकांना आवडेल की न आवडेल, पण त्याने भारताच्या अनेक क्षेत्रांतील माहिती गोळा करून ती त्याच्या ग्रंथात दिली आहे. केवळ राजकारणात नव्हे तर त्याने भारताची कला, संगीत, दवाखाने, वर्तमानपत्रे, सिनेमा व धर्म इत्यादी संबंधीही माहिती दिली आहे.विव्हल निकल्स याच्या ग्रंथाचे नाव, व्हर्डीक्ट ऑफ इंडिया (भारतातील निवाडा) असे असून सदर ग्रंथ हा इंग्रजी भाषेत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांची घेतलेली मुलाखत या ग्रंथात दिलेली आहे. बाबासाहेबांचा त्याने सहा विद्वानांपैकी एक असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल त्यावेळच्या काँग्रेस पुढाऱ्यांच्या कल्पना काही और होत्या. त्यातून बाबासाहेबांच्या पुढारपणाबद्दलच्या त्यांच्या कल्पना तर विचारूच नका. भारतीय घटना समिती अजून सुरू व्हावयाची होती. त्या आधी सरदार वल्लभभाई पटेल यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर जो पत्रव्यवहार केला होता, त्यामध्ये अशा काही कल्पना दिसून येतात. त्या नमूद करण्यापूर्वी, हेपत्र पंडित विव्हलीं निकल्स बाबासाहेबांच्या पुढारपणाबद्दल आपल्या ग्रंथात काय म्हणतात, हे येथे नमूद केल्यास बरे होईल. विव्हलीं निकल्स लिहितात -” काही लोक आंबेडकरांच्या हक्काला आव्हान देतात. आंबेडकरांची एखादीही जाहीर सभा जे ऐकतील ते तसे आव्हान देण्याच्या भानगडीत पडणार नाहीत.” उदाहरणादाखल, पत्रकार लेखकाने नागपूरच्या जाहीर सभेचा उल्लेख केला आहे. त्या सभेत अंतःकरणपूर्वक ज्या उत्कंठेने जनतेने बाबासाहेबांना साथ दिली त्यामुळे गांधींना देखील आंबेडकरांचा मध्ये हेवा वाटला असला पाहिजे, असे त्याने आपल्या ग्रंथात नमूद केले आहे. सुध्दा बाबासाहेबांच्या वक्तृत्वाच्या अनेक पैलूवर प्रकाश टाकताना सदर विदेशी पत्र पंडित म्हणतो-आंबेडकर जाहीर सभेत जनतेसमोर भाषण करतात त्यावेळी सर्व जनताच खडबडून जागी होते. जनतेत ते तील सामर्थ्य निर्माण करतात आणि बोलतांना ते असे मुद्देसुद बोलतात की काही विचारू नका. कला, काँग्रेसचे पुढारी व बाबासाहेब आंबेडकर यांच्या वक्तृत्वाची सदर लेखकाने मोठी मार्मिक तुलना केली आहे, त्या बाबत हा लेखक म्हणतो काँग्रेस पुढाऱ्यांच्या सरासरीच्या वक्तृत्वाशी व्य हा आंबेडकरांच्या भाषणाची तुलना करावयाची म्हटले रांची तर, काँग्रेस पुढाऱ्यांचे भाषण हे हिंदू-लोक म्हणत आहे. असलेल्या मंत्राप्रमाणे असते; तर आंबेडकरांचे भाषण हे पिस्तूलातून सटासट सुटणाऱ्या गोळ्यांप्रमाणे असते. त्यामुळे भारतातील सहा विद्वानांपैकी एक असणारे आंबेडकर हे भारतात ज्यांचा जास्तीत जास्त द्वेष केला जातो त्यापैकी एक असेही ते ठरले गेले आहेत, असे उद्गार लेखक, पत्र पंडित यांनी मती आपल्या ग्रंथात नमूद केले आहेत.
– भीमराव तायडे, नांदुरा (जिल्हा: बुलडाणा) मो. ९४२०४५२१२३
संदर्भ: समग्र आंबेडकर चरित्र या अॅड.बी.सी. कांबळे यांच्या ग्रंथावरून संपादित
पूर्वप्रसिद्धी-धम्मयान