स्वारातीम विद्यापीठातील फुले-आंबेडकर नवयान जयंती महोत्सव समिती कार्यकारणी गठीत
स्वारातीम विद्यापीठातील फुले-आंबेडकर नवयान जयंती महोत्सव समिती कार्यकारणी गठीत
सामाजिक सुधारणेचे जनक महात्मा जोतीराव फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती मोहोत्सवाचे आयोजन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी,विद्यार्थी तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या नवयान फुले -आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती अध्यक्षपदी जयवर्धन गच्चे तर कार्याध्यक्षपदी रिपब्लिकन एम्प्लॉईज कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष काळबा हनवते यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्रात नसोसवायफचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. डी. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला डॉ.रवी एन. सरोदे डॉ.राजेंद्र गोणारकर,प्रा. सतीश वागरे, डॉ.प्रविणकुमार सावंत यासह विद्यापीठ कर्मचारी, विद्यार्थी मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.
संपूर्ण विश्वभरात साजरी होणाऱ्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तब्बल दोन वर्षांनंतर मोठ्या थाटामाटात पहिल्यांदाच साजरी करण्यात येणार आहे. लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच दि.११ रोजीपासून सुरू होणाऱ्या भव्यदिव्य स्वरूपातील यावर्षीच्या नवयान फुले -आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवात प्रसिध्द विचारवंतांच्या व्याखानमालेसह कवी संमेलन, रांगोळी स्पर्धा, मोफत आरोग्य तपासणी शिबीर,सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच आठरा तास अभ्यास आदी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या नवयान २०२२ फुले -आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती अध्यक्षपदी जयवर्धन गच्चे यांची तर कार्याध्यक्षपदी काळबा हनवते यांची निवड करण्यात आली आहे.
समितीत मुख्यमार्गदर्शक म्हणून डॉ.रवी एन. सरोदे (संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ, स्वारातीम विद्यापीठ) व डॉ.राजेंद्र गोणारकर (माध्यमशास्त्र संकुल स्वारातीम विद्यापीठ) यांचे मार्गदर्शन असणार आहे तर पुढील कार्यकारणी याप्रमाणे करण्यात आली आहे. यात समन्वयक म्हणून डॉ.पी.विठ्ठल यांची निवड करण्यात आली तर समितीच्या उपाध्यक्षपदी इंजि.अरूण धाकडे, जालिंदर गायकवाड, साहेबराव गजभारे, सचिव अनुपम सोनाळे,प्रसिध्द प्रमुख संदीप एडके ,मनोहर सोनकांबळे सहसचिव प्रदीप बिडला, सविता भिसे,शामला भालेराव,प्रकाश तारू, संघटक विलास साळवे अनिल कळसकर संभा कांबळे, नारायण गोरे,बळीराम चित्ते,विजयकुमार अचलखांब, दिलीप चित्ते,तर सदस्यपदी आदिनाथ डोपेवाड, शोभा पोटफोडे, ज्योती चित्तारे, जया बुकतरे, जयवर्धन गोवंदे, विवेक भोसले,बालाजी शिंदे, अनिल सोनकांबळे, दिशु गायकवाड, आर्यन गजभारे, स्वप्नील हिंगोले,चंद्रपाल गच्चे, अनुष्का राऊत,आरती सूर्यवंशी, जय खंदारे, विनोद साळवे,शीतल नांगरे, पुंडलिक गच्चे, नितेश हनवते, विजय पांगरकर, सदानंद गायकवाड यांची सदस्यपदी निवड करण्यात आली असून व्यवस्थापन समितीत डॉ.राहुल गच्चे, संदीप जोंधळे, दिनेश येरेकर,चंद्रगुप्त साळवे,सिद्धांत दिग्रसकर, आदींचा समावेश आहे.
बडया सर खुप सुंदर