एका स्त्रीने केलेल्या ११ लग्नांची गोष्ट..
एका स्त्रीने केलेल्या ११ लग्नांची गोष्ट
लग्न हे सात जन्माचं नातं असतं हे आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. असा विचार करून लोकं नातं आयुष्यभर जपायचे. बदलत्या काळानुसार आणि नात्यांमधील संघर्ष, घटस्फोट आणि पुनर्विवाह आता सामान्य झाले आहेत. काही प्रकरणांमध्ये एका व्यक्तीने ३-४ लग्न केल्याचे तुम्ही ऐकले असेल, परंतु तुम्ही कधी ११ लग्नांबद्दल ऐकलं आहे का? अर्थात. नसेलच ते देखील एखाद्याने स्त्रीने ११ लग्न केल्याचे ऐकले नसेलच पण ही बातमी खरी आहे. अशी एक महिला आहे जीन चक्क ११ लग्न केलेत, जिला लग्नाचे व्यसन आहे. या ५२ वर्षीय महिलेने आतापर्यंत ११ लग्न केले असून ती १२ वं लग्न करण्याची तयारी करत आहे.
कोण आहे ‘ही’ महिला ?
मोनेट डायस नावाची ही महिला अमेरिकेतील उटाह (UTAH) मध्ये राहते. अलीकडेच तीची एका मुलाखत प्रसिद्ध झाली. या शोमध्ये या 52 वर्षीय महिन्याने तिच्या लग्नांबद्दल तपशीलवार माहिती दिली. तिने सांगितले की, तिने ११ वेळा लग्न केले आहे आणि आता ती १२ वं लग्न करण्याचा विचार करत आहे. मोनेट म्हणते की, ”मी पटकन प्रेमात पडते. आतापर्यंत मला सुमारे २८ वेळा प्रपोज करण्यात आलं आहे.” लग्नानंतर मोनेटला साथीदाराबरोबरचे संबंध चांगले वाटत नाहीत, तेव्हा ती नवीन नात्याच्या शोधात निघून जाते.
सर्व पतींची नावे लक्षात
मोनेटला सर्व ११ पतींची नावं लक्षात आहेत का असा प्रश्न विचारला असता तिनं उत्तर दिली की, ”माझ्या कुटुंबातील सदस्यांना माझ्या सर्व पतींची नावे आठवत नाहीत. पण मला माझ्या सर्व पतींची नावे आठवतात.” यानंतर तिने सर्व पतींची नावे क्रमवार सांगितली.
मोनेट डायस सांगते की, या सगळ्यांपैकी जे लग्न सर्वात जास्त काळ टिकलं ते १० वर्षांचं होतं. तर सर्वात कमी काळ टिकलेलं लग्न केवळ ६ आठवड्यांचं होतं. ११ लग्नानंतर आता मोनेट १२ व्या लग्नासाठी सज्ज झाली आहे. त्यांनी यासाठी जॉन नावाच्या ५७ वर्षीय व्यक्तीची निवड केली आहे. जॉनचा दोन वेळा घटस्फोट झाला आहे. यावेळी त्यांचे लग्न जास्त काळ टिकेल असे त्यांना वाटते.
प्रा डॉ सुधीर अग्रवाल
९५६१५९४३०६