भटक्या, विमुक्त ,मेहतर विद्यार्थी व मुस्लिम मुलींना मिशन मध्ये दत्तक घेऊन निशुल्क प्रवेशासाठी पाठवा..

भटक्या, विमुक्त ,मेहतर विद्यार्थी व मुस्लिम मुलींना मिशन मध्ये दत्तक घेऊन निशुल्क प्रवेशासाठी पाठवा…
राजश्री शाहू महाराज यांची स्मृती शताब्दी (१९२२ ते २०२२) आंबेडकरवादी मिशन च्या वतीने.. सामाजिक लोकशाही वर्ष.. म्हणून राष्ट्रीय अभियान राबवले जाणार आहे.
याअंतर्गत प्रामुख्याने भटक्या आणि विमुक्त प्रवर्गातील 100 विद्यार्थ्यांना आंबेडकरवादी मिशन मध्ये निशुल्क प्रवेश दिला जाणार आहे. कैकाडी , पारधी ,वडार ,छप्परबंद, गोसावी ,गारुडी लोहार , घिसडी,गोंधळी, कोल्हा कोलाटी मसणजोगी, पांगुळ, बहुरूपी मेहतर या समाजातील मुले आणि मुली या सोबतच मुस्लिम मुलींना निशुल्क प्रवेश दिला जाणार आहे. वरील प्रवर्गातील 100 विद्यार्थ्यांना निशुल्क प्रवेश दिला जाईल.
आंबेडकरवादी मिशन चे जे अधिकारी विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या नोकरीच्या ठिकाणावर वरील प्रवर्गातील पदवीधर विद्यार्थ्यांना आंबेडकरवादी मिशन मध्ये निशुल्क प्रवेशासाठी शिफारस करावी. आंबेडकरवादी मिशनच्या अधिकाऱ्यांना फक्त या विद्यार्थ्यांची मेस साठी प्रति महिना योगदान द्यायचे आहे मिशन केंद्राची बाकी इतर फीस आम्ही निशुल्क ठेवणार आहोत.
मिशन ऑफिसर ने शंभर मुले आपापल्या परिसरातून पाठवले तर आंबेडकरवादी मिशन चा संदेश त्याच्या परिसरात जाईल आणि तुमच्या नावानेही विद्यार्थी दत्तक मिशनसाठी असतील त्यामुळे मिशनचा सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचा व शिक्षणात व उच्च पदासाठी तळागळातील विमुक्त व भटक्या जातींना प्राधान्य देण्याचा हेतू साध्य होईल.
त्यामुळे वरील जातीतील विद्यार्थ्यांना प्रामुख्याने आंबेडकरवादी मिशन मध्ये पाठवावे…..
राज्यसेवा पूर्व परीक्षा जुनं आहे व नोव्हेंबर २२ मध्ये कम्बाईन पूर्व परीक्षा आहे तत्पूर्वी वरील विद्यार्थी पाठवले तर नक्कीच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वर्गाचे लाभ घेता येतील.
.दीपक कदम
प्रमुख आंबेडकरवादी मिशन.
pH..९३२६९३२०४९
९३७०७५३०५९.