संपादकीय

आम्ही आंबेडकरवादी

जातीय आर्थिक शोषणा विरूद्ध आवाज बुलंद करून येथील विषमतावादी व्यवस्था हादरून सोडली ज्यांना पशुपेक्षाही हीन वागणूक दिली होती . त्यांना स्वाभिमान मानुषकी ने जगण्यास शिकविले. ज्याची मान नेहमी जोहार करण्यास सरसावली असायची तिरस्कार अपमान सहन करण्यात जीवन व्यतीत केले.त्याना ताठ मानेने छाती पुढे करून बोलण्याची संधी प्राप्त करून दिली.समतेच्या प्रवाहात सामील करून समतेने वागण्यास माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला.सामाजिक राजकिय संघटन तयार करून येथील व्यवस्थेसी दोन हात केले.आपला दबाव निर्माण केला.त्यासाठी अपार कष्ट सहन केले.उपाशी राहून ज्ञान संपादन केले.
बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा राजरत्न बिना औषधाने मरण पावला त्यांच्या अंत्यसंस्कार करते वेळी नविन कपडे घेण्याची सोय नव्हती.त्यावेळी माता रमाई ने आपले लुगडे फाडून त्यात राजरत्न ला गुंडाळून अंत्यसंस्कार करण्यात आले. व लगेच राउडटेबल कानफरनसला प्रदेशात जाण्याची तयारी केली. तेव्हा त्याचे भाऊ म्हणाले की आताच लाडका राजरत्न आपणातून गेला . त्याला नविन कपडे घेण्याची सोय नव्हती. त्यावर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की माझा राजरत्न बिना औषधाने बिना कपड्याने गेला परंतु माझ्या समाजाला टाय कोटात वावरताना पाहायचे आहेत. हीच राजरतनाला आदरांजली ठरेल व दुःख विसरून समाजाच्या भल्यासाठी प्रदेशात गेले.व अस्पृश्य लोकांना हक्क अधिकार मिळवून दिले.
शासन प्रशासन मध्ये लोकांचा भरणा दिसून येतो हा परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागाचे फलीत होय.
आज आम्ही भावनेत गुंतवून बाबासाहेब आंबेडकरनी दिलेल्या दिशेपासून व कार्यक्रम न राबविता केवळ एका जाती पुरता मर्यादित ठेवीत आहोत बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा जाती विहीन समाजासाठी लढण्याच्या कार्यक्रमापासून दूर जात आहोत.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या रिपब्लिकन पक्षाला सोडून सत्ता धारी सोबत चुबाचुबी करतो.
बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने हयातभर छळले. त्यांना संविधान सभेत जाण्यापासून रोखण्यासाठी दारे दरवाजे झरोके सुद्धा बंद केले होते परंतु जोगेंद्रनाथ मडलनी बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेत पाठविले.

आज बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या तीन संघटना समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा व रिपब्लिकन पक्ष विखूरला असून संघटित करण्याचा कोणताही कार्यक्रम नाही रिपब्लीकन पक्षाविषयी घृणा कशी निर्माण होईल यांचा जाणीव पूर्वक प्रयत्न केला जातो.
व्यवस्थेला पूरक असलेल्या काँग्रेस व भाजपचे झेंडे खांद्यावर घेऊन चालण्यास कोणतीही लाज लज्जा वाटत नाही.उलट आम्ही आंबेडकर वादी असल्याचा दावा केला जातो.समाजाला आपल्या नांदी लावून निळ्या झेडया ऐवजी तिरंगा व भगवा झेंडा दिला जातो अश्या घरभेदया पासून सावध आसने गरजेचे आहे.रिपबलिकन पक्षात राहणे म्हणजे स्वाभिमानाने जगणे होय दुसर्याच्या पक्षात जाणे म्हणजे गुलामी स्विकारणे होय.यासाठी स्वाभिमानी आंबेडकर अनुयायीने रिपब्लीकन पक्षांचा ध्यास घ्यावा
जयभिम जय रिपब्लिकन
विनायकराव जामगडे
९३७२४५६३८९
७८२३०९३५५६

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button