व्यक्तिविशेष

शिकवणीच्या पलीकडे जाऊन स्नेह मैत्री, मानवतेची शिकवण देणारे प्रा.सहदेव केंद्रे सुबक स्वभावाचे अवीट व्यक्तिमत्त्व..!

शिकवणीच्या पलीकडे जाऊन स्नेह मैत्री, मानवतेची शिकवण देणारे प्रा.सहदेव केंद्रे सुबक स्वभावाचे अवीट व्यक्तिमत्त्व..!

निसर्ग परिवर्तनशील आहे. तसाच तो न्यायिक आहे.पण त्याच्या न्यायाच्या चौकटीत प्रत्येक माणसाला आपली फिर्याद मांडता येत नाही.कारण माणूस लोभी,स्वार्थी,आणि संयमशून्य आहे.इथे प्रत्येकाला आपला मोठं व्हायचं आहे.प्रत्येकाला आपली प्रगती साधायची आहे.मात्र जो माणूस दुसऱ्यांच्या प्रगतीतून आपली प्रगती आपोआप होईल अशी मनीषा बाळगणारे माणसे म्हणजे उंबराचे फुलच.मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त असलेल्या बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील उमराई या गाव खेड्यातून गयाबाई नरसुबा केंद्रे या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेल्या प्रा.सहदेव केंद्रे या व्यक्तिमत्वाची कर्तृत्वकहाणीही एका उंबराच्या फुलाप्रमाणे आहे.कारण जो माणूस दुसऱ्याला घडवण्यात मोठेपणा मानून पैशाच्या पाठीमागे न लागता त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास जसा असेल तसा ज्या परिस्थितीत,ज्या गरीबीत जेवढी फीस तो भरेल तेवढ्यात समाधानी राहून रोपट्याचं वटवृक्ष निर्माण करतो ना असा माणूस शोधूनही सापडणार नाही.जगात अनेक निरनिराळ्या शिकवण्या असतील निरनिराळे कौशल्य आत्मसात करण्यासाठी मार्गदर्शन करणारे मार्गदर्शकही असतील पण जो मार्गदर्शक त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यात
केवळ शिकवणीचीच पेरणी न करता स्नेहाची,मैत्रीची,मानवतेची पेरणी करतो ना तो शिक्षक खऱ्या खऱ्या अर्थाने मोठा ठरतो.ज्याच्या स्वभावात केवळ प्रेम,मैत्री, बंधुभाव आणि ज्ञान द्यायचे आणि देण्यास प्रवृत्त करायचे आहे.आशा माणसाचा स्नेहबंध म्हणजे हेवा वाटावा असा आहे.घरची परिस्थिती बेताचीच.आपलेच दात आपण कोरून खावे पण जगावे आशा स्वरूपाची शेती असणारे अल्पभूधारक कुटुंब. घरात कुणीच शिक्षणाची रीघ ओढली नाही.तरी प्रा. सहदेव केंद्रे उमराई या आपल्या जन्मगावी प्राथमिक शिक्षण पूर्ण करून तत्कालीन दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट मार्क घेऊन आपला पुढील शैक्षणिक प्रवास इंजिनिअरिंगच्या दिशेने रेटला.

एक काळ होता जेव्हा इंजिनिअरिंग म्हणजे खूप जड आणि अतिसामान्यांच्या आवाक्याबाहेरील शिक्षण पण हेच शिक्षण औरंगाबादच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून मोठ्या कष्टाने पूर्ण केले. एवढेच नाही तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग अभ्यासक्रमात अग्रक्रमांची रँक मिळवणाऱ्या केंद्रे सरांनी सुवर्णपदक प्राप्त केले. तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी विषयाचा गाढा अभ्यास असणाऱ्या केंद्रे सरांच्या जीवनात संघर्ष अगदी कोवळ्या वयापासूनच सूर झाला.जेव्हा एखाद्या कुटुंबातील कर्ता सदस्य हा सतत चार वर्षांपासून बिमार असेल आणि उत्पन्नाची सर्वश्रोत जर बंद असतील तर त्या कुटुंबाची काय हाल असेल याची कल्पनाच न केलेली बरी.पतीचे हे सतचे बिमार असणे आणि घर चालवणे याला खंबीरपणे तोंड देण्यासाठी ज्या माउलीने आपले बळ पणाला लावले त्या केंद्रे सराच्या मातोश्री गयाबाई यांनी संपल्या शेतात स्वतःच नांगरणी, वखरणी अशी पुरुषांची कामे केली.याच काळात आपलं शिक्षण सांभाळत दूध काढणे ,विकणे आईला सतत मदत करणे हे सगळे कष्टप्राय दिवस केंद्रे सरांनी मोठ्या संघर्षातून काढले. त्यामुळेच त्यांना असणारी परिस्थितीची जाण ही त्याच्या संवेदनशील मनाची साक्ष देते. सध्या सरकारी शाळा-महाविद्यालये ओसाड आणि खाजगी शिकवणी फुल्ल अशी परिस्थिती झाली आहे. या वास्तवाचा शोध घेता एक गोष्ट सर्वार्थाने घडत अली आहे ती म्हणजे कधी हा माणूस पैशाच्या पाठीमागे लागला नाही.ना कोणता हव्यास पाळला. जाहिरातीच्या युगात मार्केटमध्ये नाव करण्यासाठी मोठी प्रसिद्धी व्हावी लागते;पण या माणसाने केवळ विद्यार्थ्यांला फायदा झाला पाहिजे या बाबीचे काटेकोरपणे पालन केले त्यातूनच जे जे विद्यार्थी घडले त्या विद्यार्थ्यांनीच केंद्रे इन्स्टिट्यूटही घडवले.जाहिरातीच्या युगात मार्केटमध्ये नाव करण्यासाठी मोठी प्रसिद्धी व्हावी लागते;पण या माणसाने केवळ विद्यार्थ्यांला फायदा झाला पाहिजे या बाबीचे काटेकोरपणे पालन केले त्यातूनच जे जे विद्यार्थी घडले त्या विद्यार्थ्यांनीच केंद्रे इन्स्टिट्यूटही घडवले.शिकवणीचा काळ संपून पाच पाच वर्षे झाले तरी विद्यार्थ्यांच्या मनातून जो माणूस तसुभरही जात नाही त्या माणसाची रीत वेगळीच म्हणावी लागेल.जेव्हा एखादा शिक्षक कुटुंबाप्रमाणे विद्यार्थ्यांना जीव लावतो आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून जेव्हा विद्यार्थ्यांचे जीवन उजळते ना तेव्हा त्या माणसाचा लौकिकार्थ अडवणे अशक्य आहे.
केंद्रे सरांनी आपल्या ज्ञान, अनुभवातून तयार केलेल्या नोट्स आणि त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून प्रकाशित झालेल्या त्यांच्या विविध प्रकारच्या पॉलटेक्निक व इंजिनिअरिंगच्या पुस्तकांनी मार्केट काबीज केले. दिवसेंदिवस विद्यार्थ्यांच्या पसंतीस खरे उतरणारे त्यांची पुस्तके आज सर्वत्र वाखानली जात आहेत.
राज्यासह देशात विविध प्रकारची पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगच्या इन्स्टिट्यूट असली तरी औरंगाबादच्या मध्यवर्ती भागात त्यांनी उभारलेलं केंद्रे इन्स्टिट्यूट म्हणजे केवळ शिकवणुकीच्या कोरड्या भिंती नाहीत तर तिथूनच बाहेर पडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनाची घालमेल म्हणजे “कन्या सासुरवासी जाई माघे परतुनी पाही” अशा प्रकारचे केंद्रे इन्स्टिट्यूटचे ते वातावरण म्हणजे एक प्रकारे माहेरघर आहे. जेव्हा विविध भागांतील विद्यार्थी कॉल करून चौकशा करतात तेव्हा पहिला प्रश्न असतो ‘ सर मी अगोदर येऊन रूम करतो राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था करतो मग माझं सगळं सामान घेऊन येतो” त्यावर केंद्रे सर म्हणतात “तू जसा आहेस तसा ये जेवढे पैसे असतील तेवढे घेऊन ये तुझ्या राहण्याची, खाण्याची व्यवस्था होईल,वडिलांशी बोलणं करून दे”आणि काय वैशिष्ट्य जेव्हा एखादा विद्यार्थी थेट केंद्रे इन्स्टिट्यूटला पोहोचतो ना तेव्हा त्याला रिक्षातून उतरवण्यापासून त्याच्याजवळील बॅग व अन्य ओझे उचलून इन्स्टिट्यूटमध्ये ठेवण्यापर्यंतची मदत करणारे हेच विद्यार्थी असतात.प्रत्येकाने प्रत्येकाची मदत करायची मैत्री निर्माण करायची आणि ती टिकवायची.हे सगळं केंद्रे इन्स्टिट्यूटमधून घडवून येत.एखाद्यावेळेस कमी अधिक गोष्टी झाल्या असतील तेव्हा थेट त्या विद्यार्थ्यांच्या रूमवर जाऊन रुममालक आणि विद्यार्थ्यांत सामंजस्य निर्माण करणारा हा माणूस प्रत्येक विद्यार्थ्यांला कधी शिक्षक वाटत नाही तर आपला मित्र वाटतो आणि एखाद्या शिक्षकाचे शिकवणे आणि मित्रात झालेली चर्चा व सांगावांगी म्हणजे दीर्घकाळापर्यंत टिकून राहणारे ज्ञान होय.त्याच्या शिकवण्याची सुलभता आणि स्वाभावाची सुबकता याच आधारावर केंद्रे सरांनी अनेक विद्यार्थ्यांच्या शासकीय नोकरीच्या स्वप्नांना आकार दिला आहे .आज दिवसेंदिवस केंद्रे इन्स्टिट्यूटचा वाढता प्रभाव आणि विस्तारत जाणारं प्रा.सहदेव केंद्रे यांचे हे वलय गुणवत्तेशी सांगड घालून आहे.माणसाच्या आचार विचारात ,विवेकवाद, विज्ञान, मैत्री आणि मानवता असल्या की अशी माणसे असे माणसं घडवत असतात.ज्यांची समाजाला नितांत गरज असते. कोणी कमी अधिक मेहनत करून अधिकारी होतील पण तुमच्यातील समाजाभिमुख अधिकारी बनवण्यासाठी प्रा.सहदेव केंद्रे यांच्या मूलमंत्राचा मापदंड अधिक सरस ठरतो. आपल्या ज्ञानाच्या ताकतीवर सर्वत्र प्रसिद्धीरूपातून झळकत असलेले औरंगाबादमधील केंद्रे इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा.सहदेव केंद्रे म्हणजे शिकवणीच्या पलीकडे जाऊन स्नेह मैत्री, मानवतेची शिकवण देणारे सुबक स्वभावाचे अवीट व्यक्तिमत्त्व होय.

आज त्यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा व उत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती होत जाऊन सुखसंपन्न,आरोग्यसंपन्न जीवन लाभो ही सदिच्छा..!

(-मनोहर सोनकांबळे
8459233791
संशोधक विद्यार्थी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

संकलन-अमोल गोणारकर, नांदेड)

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button