- 'ताल'
- सुभाष घाई
भारतीय सिनेमा जगतात याच चित्रपटाचा पहिल्यांदा विमा काढला गेला..
हल्ली आपण आपला व आपल्या कुटुंबातील व्यक्ती,घर,व्यापार,व्यवसाय, गाडी-घोडी, या सारख्या जवळ जवळ सगळ्याच गोष्टींचा विमा काढून घेतो. विमा कवच म्हणजे एक प्रकारची सुरक्षितताच.पण तुम्हाला माहीत आहे काय की, असा कोणता कोणता पहिला चित्रपट आहे ज्याचा विमा काढला होता ? तर सुभाष घाई या दिग्दर्शकाचा १९९८ साली आलेला ‘ताल’ हा असा पहिला चित्रपट आहे ज्याचा विमा काढण्यात आला होता.ए. आर. रहेमान यांनी संगीतबद्ध केलेले गाणे,अक्षय खन्ना, ऐश्वर्या राय, अनिल कपूर या कलाकारांनी साकारलेला आणि महत्वाचे म्हणजे ताल से ताल मिला हे प्रसिद्ध गाणं याच सिनेमातील आहे.आता तर प्रत्येक सिनेमाचे विमा काढले जातात.