ग्रामीण भागात फायनान्सचे फुटणारे पेव; आर्थिक क्रांती की संकटचुंबन
ग्रामीण भागात फायनान्सचे फुटणारे पेव; आर्थिक क्रांती की संकटचुंबन
ग्रामीण भागात फायनान्सचे फुटणारे पेव; आर्थिक क्रांती की संकटचुंबन
वाढती महागाई आणि उत्पन्नाचे अपुरे साधन यामुळे आज घडीला जनजीवन अगदीच आर्थिक संकटात सापडलेलं आहे.याचाच फायदा घेऊन भांडवलदार वर्गाने फायनान्स कंपन्या थाटल्या.सुरुवातीला या कंपन्यांनी शहरातून सुरुवात केली असली तरी आता ते पेव ग्रामीण भागातही अधिक गतीने विस्तार जात आहे. एकीकडे देश महासत्ताकाच्या दिशेने जात असताना दुसरीकडे इथलं सामान्य माणूस कर्जाच्या फासत गुरफटत चालला आहे. अशा परिस्थितीत मात्र खाजगी फायनान्स कंपन्या लोकांना कर्ज वाटप करून ज्यादा व्याजदराने चाललेली वसुली हा नफेखोरीचा धंदा तेजीत चालवीत आहेत.घर ,लग्न ,शेती,छोटा व्यवसाय,व अन्य कारणासाठी कर्ज घेत असलेला माणूस दिवसेंदिवस कर्जाच्या डोंगरात पडता बुडत चाललेला आहे. त्यामुळे देशातील आर्थिक ध्येयधोरणे आणि जनसामान्यांचे उत्पन्न आणि देशाचे दरडोई उत्पन्न या संपुर्ण बाबतीत देशात सध्या आर्थिक क्रांती नाही तर संकटचुंबन ओढवून घेतली जाणारी परिस्थिती निर्माण होत आहे.