प्रदिप भनारकर यांच्या पुढाकारातून भोई समाजातील कुटुंबाना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ
प्रदिप भनारकर यांच्या पुढाकारातून भोई समाजातील कुटुंबाना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ
सुनील शिरपुरे/ झरीजामणी
भाजपा मच्छीमार सेलचे महामंत्री प्रदिप भनारकर यांच्या पुढाकारातून वृंदावन टाकळी येथील गरीब कुटुंबांना शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात आला.
वृंदावन टाकळी येथे नुकताच राशन कार्डसाठी तहसील कार्यालयाकडून कॅम्प घेण्यात आला होता. गरजू लाभार्त्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा या उद्धेशाने येथील भोयी समाजाच्या कुटुंबियांसाठी घेण्यात आलेल्या या कॅम्पच्या नियोजनात भाजप मच्छीमार महासेलचे महामंत्री प्रदीप भणारकर यांचा पुढाकार होता.
अन्नपुरवठा अधिकारी सोनटक्के मॅडम व तहसीलचे कर्तव्यदक्ष कर्मचारी तिरणकर मामा नाना भाऊ सुनील भिमरतिवार यांच्या सहकार्याने भोई समाजाच्या तीन कुटुंबांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ अन्नपुरवठा अधिकारी शुभम फाले यांनी वृंदावन टाकळी येथे राशन कार्ड साठी कॅम्प लावण्यात आला होता. त्याप्रसंगी शुभम फाले यांनी गरजूंना राशन कार्ड मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले .यावेळी वैशाली नारायण भनारकर, सुलोचना मनोज भनारकर व दिपाली अरुण भनारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
वृंदावन टाकळी येथील वैशाली भनारकर सुलोचना भनारकर दिपाली भनारकर ह्या तीन परिवाराने आभार मानले.I