राजकीय झेंड्याच्य ओझ्याखाली पिचलेला ओबीसी
राजकीय झेंड्याच्या ओझ्याखाली पिचलेला ओबीसी..
विजय पोहनकर बोलतोय..
भ्रमणध्वनी 9579141618
हिंदी चित्रपटात सध्या एक ट्रेण्ड सुरू आहे. ‘दाऊद’ला यशस्वीपणे पाकिस्तान मधून पकडून आणले.वेगवेगळे लेखक आपल्या बुद्धी ने लिखन करून गोष्ट लिहितात,त्याला तडका दिगदर्शक मारतो.हे कथानक बघून पाकिस्तान मध्ये आइयाशी करणारा दाऊद फिदीफिदी हसत असेल.त्याच प्रमाणे ओबीसी समाजाला ‘इमेरियाल डेटा’ या हिंदी कथानकानुसार मूर्ख बनविण्याचे काम केंद्रीय सत्ता व राज्य सरकार करीत आहे.हे ओबीसी नेतृत्वाने समजून घ्यावे.
स्वतंत्र भारतात शूद्रांना (ओबीसीनां) खरा न्याय दिला तो पूजनीय डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी. बाबा नसते तर….विचार केला तरी अंगावर काटा उभा राहतो.ओबीसी करिता केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर एकमेवाद्वितीय मंत्री होऊन गेले.मात्र,आम्हा ओबीसी ना त्यांचे काहीच सोयर सुतक नाही.आजही शोकांतिक आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर हे फक्त आणि फक्त मागासवर्गीय चेच नेते म्हणून मनुवाद्यांनी प्रस्थापित केले.असो.!
महाराष्ट्र राज्यात 350 ओबीसी जाती असून केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील महाविकास आघाडी सरकार ओबीसी ना न्याय देऊ शकले नाही,देऊ शकत नाही.ह्यांची नियतच साफ नाही.ह्याला कारण म्हणजे आमचा ओबीसी राजकीय झेंडे उचण्यात जातीय भांडणात प्रचंड गुणतला आहे. धर्माच्या नावावर एकत्रित होणारा ओबीसी,ओबीसी म्हणून एकत्रित का होत नाही.ह्याचा प्रकर्षाने विचार होत नाही. हिंदू,मुस्लिम,ख्रिश्चन,जैन धर्मातील ओबीसी सुस्त,झोपलेला आहे.आज ओबीसी चे राजकीय आरक्षण रद्द झाले,उद्या शैक्षणिक होईल,परवा नौकरीत आरक्षण रद्द होईल तो पर्यन्त हा ओबीसी कुंभकर्णी झोपेतच राहील का? या प्रश्नांची उत्तरे ओबीसी लाच शोधावी लागतील.
मुख्यतः राज्यात ओबीसी व मायक्रो ओबीसी असा प्रमुख फरक आहे.राजकीय पक्षणां ओबीसी एकत्रित येऊ शकतं नाही ह्याची शाश्वती झाली आहे हेच सत्य आहे.ओबीसी जातीत,धर्मात गुरफटला आहे.मुस्लिम ओबीसी आजही रस्त्यावर ओबीसी म्हणून प्रमुखतेने दिसत नाही हे सल्य आहे.हीच बाब जैन, ख्रिश्चन धर्मातील ओबीसी ची आहे.हिंदू धर्मातील ओबीसी हा मोठ्या जाती व लहान जातीत अडकून पडला आहे.ज्यांचा ओबीसी बाबद अभ्यास नाही ते बहुतांश जिल्हास्तरीय नेतृत्व करतांना दिसतात.पाटील,कुणबी,माळी,धनगर, ह्या ओबीसी मधील मोठ्या जाती ओबीसी चे नेतृत्व करतांना दिसतात.त्यात मायक्रो ओबीसी मधील नेते मंडळी ही लोनच्या पापडाचीच भूमिका अदा करतांना आढळतात हीच चूक ओबीसी ला आक्रमक होऊ देत नाही.60%राज्यात ओबीसी असून आजही भीक मागताना दिसतो.ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 340 कलाम हे आधी ओबीसी करिता लिहले त्याच बापाला ओबीसी जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत हक्काची भिकच ओबीसी मागत राहील ह्यात आम्हाला तरी दुमत नाही.हिंदू-मुस्लिम-जैन धर्मातील मायक्रो ओबीसी अलुतेदार-बलुतेदार आजही ओबीसी लढाईत *घेतल्या जात नाही.ओबीसी समाज राजकीय झेंड्यात मरेल हेच अंतिम दिसत आहे.आज हा लेख वाचून बहुतेक ओबीसी नेतृत्वाला राग येईल मात्र राग येऊन फायदा नाही.राजकीय पुढाऱ्यांचे नेतृत्व झिंगारून सामाजिक विश्वासू नेतृत्व तेही आक्रमक तयार होत नाही तो पर्यंत राजकीय पक्ष ओबीसी ला न्याय देऊ शकत नाही,देणार नाही.आम्हला फासावर लटकावले तरी चालले मात्र,आम्ही काळा गॉगल लावून डोळा मारणारी पत्रकारिता करीत नाही ते आमच्या रक्तात नाही. राजकीय पुढ्यार्यांनी राजकीय आरक्षण रद्द झाल्यावर निवडणुकांवर बहिष्कार का घातला नाही.जोपर्यंत ओबीसी ला राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत कोणीही निवडणूक आखाड्यात उतरणार नाही अशी भीमगर्जना का झाली नाही? हा प्रश्न कोणी का विचारला नाही.हे अनुत्तरित आहे.माझ्या ओबीसी समाज बांधवांनी आज समजून घ्या,नाहीतर भविष्यकाळ तुम्हाला माफ करणार नाही ही काळ्या दगळावरील पांढरी रेष आहे.येणाऱ्या पिढ्या तुम्हाला शंड पूर्वज म्हणून गिणती करतील हेही सत्य आहे.इमोरियल डेटा कुठं गहाळ आहे,हे केंद्राला कोण विचारेल?कारण तुम्ही आम्ही पक्ष्यच्या झेंड्याखाली विभागली आहोत.जातीत विखरले आहोत. केंद्र सरकार,राज्यसरकरने ह्यावर गांभीर्याने काम करण्याची गरज होती,आहे.मात्र,ओबीसी चा ‘उपद्रव’मूल्य शून्य आहे.ओबीसी गाढ झोपेत आहे,राजकीय झेंड्यात तुमचा आमचा देह स्मशानात गेल्यावर जागे व्हाल का? हेच आज
तूर्त थांबतो.
आपला संपादक
विजय विमल सहदेवराव पोहनकर
जळगाव (जामोद) जिल्हा बुलढाणा (मातृतीर्थ)
भ्रमणध्वनी {9579141618}