कमळवेल्ली ग्रामपंचायतेत राष्ट्रमाता जिजाऊ व विवेकानंद जयंती साजरी
कमळवेल्ली ग्रामपंचायतेत राष्ट्रमाता जिजाऊ व विवेकानंद जयंती साजरी
सुनील शिरपुरे/ झरीजामणी
राष्ट्रमाता जिजाऊ यांनी स्वराज्य निर्मितीसाठी उभं आयुष्य खर्ची घातलं व स्वामी विवेकानंद यांनी युवकांना दिलेला मोलाचा संदेश, “अराईज, अवेक अॅन्ड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड” म्हणजेच ” उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही.” या जगासाठी त्यांनी केलेल्या त्यागाचा, त्यांनी दिलेल्या शिकवणीचा व यासारख्या असंख्य बहुमुल्य गोष्टी डोळ्यापुढे ठेवून, त्यांच्या कार्याला वंदन करण्याच्या अनुषंगाने आज ग्रामपंचायत कार्यालय कमळवेल्ली येथे या दोन्ही महान व्यक्तीमत्त्वाची जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम उपसरपंच वामन हलवेले यांनी या दोन्ही महान व्यक्त्तीमत्वाच्या प्रतिमेचे पुजन करून हार अर्पन केले. त्यानंतर सचिव पी.एन.बद्दमवार व उपस्थितांनी पुजन करून वंदन केले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सचिव पी.एन.बद्दमवार, उपसरपंच वामन हलवेले, सदस्य गणेशभाऊ नुगुरवार, कर्मचारी वृंद, आरोग्य विभागाचे अशोक पंदेनवार व गावातील प्रतिष्ठित नागरिक लसमय्या चुक्कलवार, युवा कार्यकर्ते अमोलभाऊ ठाकरे व धनराज सिडाम उपस्थित होते.