बाधितांना ‘कोविड रजा’ मिळावी
बाधितांना ‘कोविड रजा’ मिळावी
सरकारी अधिकाऱ्यांसह शिक्षक व इतर सर्व अस्थापणातील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना करोनाची बाधा झाली असेल तर आजारग्रस्त काळातील अनुपस्थिती विशेष कोविड रजा म्हणून ग्राह्य धरण्यात यावी व यासाठी विशेष कोव्हिडं रजा मंजूर करून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.
यावर राज्य सरकारने व शिक्षण विभागाने तातडीने निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना दिलासा दिला पाहिजे.
कोव्हिडं -१९ हा संसर्ग जन्य आजार असून कोव्हिडंला -१९ एक जागतिक महामारी म्हणून डब्युएचओने घोषित केले आहे..जगभरात सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. जगभरातील लाखो लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, आतापर्यंत लाखो लोकांचा बळी या विषाणूने घेतलेला आहे.या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेकडून ११ मार्चला २०२० ला कोरोना व्हायरस संक्रमणाला वैश्विक महामारी म्हणून घोषित केलं होतं.२०१९ पासून संपूर्ण जग कोरोना संकटाला तोंड देत असून ही महामारी संपण्याचे अजून कोणतेच चिन्ह दिसत नसल्याने कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली की रजा घ्यावी लागत आहे.. ज्यांच्या रजा शिल्लक आहेत त्यांना रजा घेताना अडचण होत नसली तरी ज्या कर्मचाऱ्यां जवळ रजा चं शिल्लक नाही त्यांना बिन पगारी रजा घ्यावी लागत आहे. त्यामुळे नको तो आर्थिक भुर्दंड कर्मचाऱ्यांना सोसावा लागत आहे.. त्यामुळे सरकारने विशेष कोव्हिडं रजा द्यावी,अशी मागणी आता कर्मचारी मोठ्या संख्येने करत आहे.
विशेष म्हणजे शिक्षण,आरोग्य विभागातील बहुतांश कर्मचारी कोव्हिडं योद्धा म्हणून कार्य करत आहे.अनेक लोकांशी या कर्मचाऱ्यांना सतत संपर्क येत असल्याने या कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग होत आहे आणि यातील बहुतांश कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील झालेला आहे.
विशेष म्हणजे कोरोना काळात बहुतांश ठिकाणी शाळा व महाविद्यालय बंद बंद आहेत.त्यामुळे बहुतांश शिक्षकांना कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य पार पाडावे लागत आहे. कर्तव्यावर असताना एखादा शिक्षक कोरोनाबाधित झाल्यास, तो बरा होईपर्यंत सवलत दिली जात आहे. मात्र, त्यांना विशिष्ट प्रकारची रजा दिली जात नाही. त्यांना त्यांच्या शिल्लक रजा खर्ची टाकून उपचार घ्यावा लागत आहे रजेशिवाय दुसरी सवलत कोणतीही नाही. अन्यथा, त्यांना बिनपगारी रजा घेऊन उपचार घ्यावे लागत आहेत.त्यामुळे अनेक शिक्षण बिनपगारी होत आहे.
या पार्श्वभूमीवरकर्तव्यावर असताना करोना संसर्गाने राज्य सरकारी कर्मचारी अथवा अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाने विमा कवच किंवा सहाय्य अनुदान मिळावे. तसेच करोना आजाराचा वैद्यकीय खर्चाच्या परिपूर्तीसाठी आकस्मिक आजारामध्ये समावेश करावा,अशी देखील मागणी होत आहे.
प्रा.डॉ.सुधीर अग्रवाल
९५६२५९४३०६