२०१७,२०१८,व २०२१च्या अपात्र विद्यार्थ्यांना वगळून २०१९ व २०२०च्या विद्यार्थ्यांना योग्य कागदपत्रांच्या पडताळणीवर बार्टी फेलोशिफ देण्यात यावी-नसोसवायएफ
२०१७,२०१८,व २०२१च्या अपात्र विद्यार्थ्यांना वगळून २०१९ व २०२०च्या विद्यार्थ्यांना योग्य कागदपत्रांच्या पडताळणीवर बार्टी फेलोशिफ देण्यात यावी-नसोसवायएफ
नांदेड: डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत उच्य शिक्षणातील संशोधन देण्यात येणाऱ्या फेलोशिफमध्ये २०१७,२०१८,व २०२१च्या अपात्र विद्यार्थ्यांना वगळून २०१९ व २०२०च्या विद्यार्थ्यांना योग्य कागदपत्रांच्या पडताळणीवर बार्टी फेलोशिफ देण्यात यावी अशी मागणी नॅशनल .एसी. एस. एसटी.स्टुडंन्ट अँड युथ फ्रंट या संघटनेने केली आहे.
बार्टी मार्फत देण्यात येणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने १ जानेवारी १०१९ ते ३१डिसेंबर २०१९ व १जानेवारी २०२० ते ३१डिसेंबर २०२० च्या कालावधीतील एम.फिल. पी.एचडी.प्रवेशित विद्यार्थ्यांसाठीच जाहिरात काढली होती;पण यात २०१७,२०१८,व २०२१च्या अपात्र विद्यार्थ्यांचाही भरणा असून हे विद्यार्थी जाहिरातीचा नियमानुसार अपात्र ठरत असलेतरी अशा नियम बाह्य विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा,मुलाखत घेण्यात आली पण सदरील विद्यार्थी हे अपात्र असून अशा अपात्र विद्यार्थ्यांना वगळून १ जानेवारी १०१९ ते ३१डिसेंबर २०१९ व १जानेवारी २०२० ते ३१डिसेंबर २०२० च्याच विद्यार्थ्यांना योग्य त्या कागदपत्रांच्या पडताळणीवर फेलोशिफ देण्यात यावी अशी मागणी
नॅशनल .एसी. एस. एसटी.स्टुडंन्ट अँड युथ फ्रंट या संघटनेने केली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. डी.हर्षवर्धन यांनी बार्टीला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच १ जानेवारी १०१९ ते ३१डिसेंबर २०१९ व १जानेवारी २०२० ते ३१डिसेंबर २०२० या काळातील एम.फिल.प्रवेश पावती तसेच यूजीसीच्या नियमानुसार पी.एचडी.चे प्रवेश R.A.C. च्य तारखेपासून गृहीत धरण्यात यावे. त्याच धर्तीवर बार्टीनेही १०१९ व २०२०च्या विद्यार्थ्यांना या पद्धतीने निवड निश्चित करण्यात यावी.तसेच २०१७,२०१८ व २०२१ च्या विद्यार्थ्यांना यामध्ये पात्र ठरवण्यात येऊ नये.अन्यथा हा २०१९ व २०२० च्या संशोधक विद्यार्थ्यांवर जाणारा अन्याय ठरेल असे निवेदन बार्टीचे महासंचालक धम्मज्योती यांना दिलेल्या ऑनलाईन पद्धतीने निवेदनात म्हटले आहे. सदरील निवेदनावर डॉ. डी.हर्षवर्धन ( राष्ट्रीय अध्यक्ष) प्रा. सतीश वागरे(राज्य प्रवक्ता) मनोहर सोनकांबळे (जिल्हा प्रवक्ता) यांची नावे आहेत.