भारतीय भाषेत रेल्वेला काय म्हणतात?तुम्ही विचार करत आहात हे नाव नाही तर खरं नाव आहे हे..
भारतीय भाषेत रेल्वेला काय म्हणतात?तुम्ही विचार करत आहात हे नाव नाही तर खरं नाव आहे हे..
‘झुक झुक झुक झुक अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी… ‘ हे गाण आपण अनेक वर्षांपासून ऐकतो. रेल्वेची आणि आपली ही पहिली ओळख असं म्हटलं तरी हरकत नाही. अनेक टप्प्यांवर, अनेक प्रसंगांमध्ये आपण रेल्वेने प्रवास करतो. रेल्वेनं प्रवास करताना मागे पडणारे स्थानक, स्थानकांसोबत मागे सुटणारे प्रदेश, प्रांत, गाव हे सर्वकाही कुतूहल वाढवून जातात. तुम्ही कधी विचार केलाय का, ज्या रेल्वेला आपण याच नावाने ओळखत आलो आहोत, त्या रेल्वेचं खरं नाव काय आहे? रेल्वे स्टेशनला भारतीय भाषेत काय म्हणतात माहित आहे का? जाणून घ्या मजेशीर नाव…काही लोकांना तर ट्रेन आणि रेल्वे स्टेशन ही नावेच भारतीय वाटतात.
लहानपणापासूनच आपण ट्रेनमधून प्रवास करत आलो आहोत. रेल्वे स्टेशनवरून आपण ट्रेन पकडतो. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का? की आपण या नावांचा उच्चार इंग्रजीमधूनच का करतो? तुम्हाला माहित आहे का रेल्वे आणि रेल्वे स्टेशनला भारतीय भाषेत काय म्हणतात? आपण नेहमीच या गोष्टींसाठी इंग्रजी नावांचा वापर करत आलो आहोत. परंतु आपण कधीच त्यांची भारतीय नावे जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही. काही लोकांना तर ट्रेन आणि रेल्वे स्टेशन ही नावे भारतीयच वाटतात. पण हे चुकीचं आहे. शुद्ध भारतीय भाषेत रेल्वेला असा शब्द आहे जो सहसा ऐकतानाही आपल्या भुवया उंचावतील.
ट्रेनला भारतीय भाषेत ‘लोहपथ गामिनी’ म्हणतात. सोप्या शब्दात लोक ट्रेनला रेलगाडी किंवा आगगाडी असेही म्हणतात. खरंतर लोहपथ गामिनी या शब्दाचे सविस्तर वर्णन केले तर समजेल की हे नाव इतके अवघड का आहे? लोहपथ याचा अर्थ लोखंडाचा रस्ता आणि गामिनी म्हणजे अनुसरण करणारी किंवा चालणारी. या सर्व शब्दांना जोडून ट्रेनला भारतीय भाषेत ‘लोहपथ गामिनी’ असे म्हटले जाते.
तसेच रेल्वे स्टेशनला भारतीय भाषेतू ‘लोहपथ गामिनी विराम बिंदू’ किंवा ‘लोहपथ गामिनी विश्राम स्थळ’ असे म्हटले जाते. वाटतं ना हे नाव अगदी रेल्वेप्रमाणेच लांबलचक. हे नाव इतके लांब आणि गुंतागुंतीचे आहे की लोक इंग्रजीत रेल्वे स्टेशन म्हणणेच पसंत करतात. ही नावे ऐकल्यानंतर तुम्ही देखील थक्क व्हाल. लोकांना सोप्या भाषेत बोलणे आवडते, त्यामुळे लोक ही कठीण नावे उच्चारण्यापेक्षा ट्रेन, रेल्वे स्टेशन म्हणणे पसंत करतात. तरुण पिढीलाही इंग्रजी भाषेचा अधिक वापर करायला आवडते.
सध्या सोशल मीडियावर रेल्वेच्या या भारतीय नावासंदर्भातील प्रश्न विचारत अनोखी प्रश्नमंजुषा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. भाषेची ही अशीच गंमत आहे. मराठी, हिंदी या भाषांमध्ये काही शब्दांसाठी असणारे अर्थ हे कुतूहल निर्माण करण्यासोबतच आपल्याला आश्चर्यचकित करणारेही आहेत.
शब्दस्पर्शी- सुनील शिरपुरे
कमळवेल्ली, यवतमाळ
भ्रमणध्वनी-7057185479