सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का ?
सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का ?
१. अष्टांग मार्गापैकी सम्यक दृष्टी हे एक थोर तत्व आहे.
२. सम्यक् दृष्टी ही श्रेष्ठ जीवनाची प्रस्तावना आणि गुरुकिल्लीच आहे.
३. सम्यक् दृष्टीचा अभाव हे सर्व पापाचे मूळ होय.
४. सम्यक् दृष्टीची वाढ व्हायला सर्व सृष्ट चमत्कार हे कार्यकारणभावांची प्रक्रिया आहे, असे पाहायला शिकले पाहिजे. सम्यक् दृष्टी म्हणजे कार्यकारणभावाची ओळख.
५. भिक्यूहो, ज्यांची दृष्टी, संकल्प, वाणी, कर्म, उपजीविका, साधना, स्मृती आणि समाधी मिथ्या आहेत, ज्यांचे ज्ञान आणि मुक्ती ही मिथ्या आहेत, ज्याचे प्रत्येक कार्य, वचन, विचार, ऐच्छिक कार्य, आकांक्षा, निग्रह आणि सर्व व्यापार ही सर्व अशा मिथ्या दृष्टीने साधलेली असल्यामुळे ती तिरस्करणीय, दुःखकर, जुगुप्सा उत्पन्न करणारी आणि हानिकारक असतात. आणि हे सर्व का? तर त्याची दृष्टी मिथ्या असल्यामुळे
६. आपला मार्ग बरोबर असणे एवढेच पुरेसे नाही. एखादे बालकही योग्य मार्ग स्वीकारते; परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की, त्या बालकाला मार्गाच्या योग्यायोग्यतेची जाणीव आहे. योग्य मार्गाचे अवलंबन करायचे म्हणजे योग्य मार्गाचे ज्ञान पाहिजे.
७. हे आनंदा, यथार्थ भिक्खु कुणाला म्हणता येईल? बुद्धिपूर्वक कोणते शक्य आहे कोणते अशक्य आहे, ह्या ज्ञानावर ज्याने प्रभुत्व मिळवले आहे त्यालाच यथार्थ भिक्यू म्हणता येईल.