शाळा विद्यार्थ्यांना वळण लावू शकते. पण…
शाळा विद्यार्थ्यांना वळण लावू शकते. पण…
शाळा विद्यार्थ्यांना वळण लावायचे काम करते. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण शाळेत अशी मुलं येतात की ज्यांना नीट बोलताही येत नाही. त्यांना नीट संस्कार म्हणजे काय हेही समजत नाही. अशी मुलं. ज्याला स्वतःचं शेंबूडही नीट पुसता येत नाही. शिक्षक त्यांना अगदी बोट धरुन शिकवतात. चालणं, वागणं शिकवतात. ती मुलं हळूहळू मुलांच्या सोबत वावरत वावरत शिक्षकांच्या सानिध्यात लहानाची मोठी होत असतात.
शाळा वळण लावते. त्यांचे जीवन अगदी कुंभाराच्या मातीच्या घड्यागत सजवते. परंतू जी मुलं आधीच अशा घरातील असतील की ज्या घरात पुरेसे संस्कारच नसतील, तर त्या मुलांना वळण लावू शकत नाही.
अलिकडं संस्काराच्या नावाखाली बारागाडे बोंब आहे. संस्कार काही बाजारात विकत मिळत नाहीत. ते संस्कार शाळेत आणि मायबापाच्या घरीच मिळत असतात तेही निःशुल्क. परंतू ते घेण्याची पात्रता विद्यार्थ्यांची असायला हवी. त्यासाठी त्याचे मायबापही त्या दर्जाचे असायला हवे. शाळेत संस्कार मिळत असते. परंतू त्याला काही अडचणी येतात. त्या अडचणी पुढीलप्रमाणे.
१) संस्कार शाळा देत असते. परंतू त्याला काही अडचणी येतात. पहिली अडचण म्हणजे न्यायालय. न्यायालय न्यायालयात न्यायनिवाडा करतांना एखाद्या प्रकरणात बारकाईनं विचार करीत नाही. ज्या देशातील निकाल हा न्यायालय देत असते. त्या न्यायनिवाड्याचा त्या देशातील नागरीकांवर कोणता परीणाम होईल याचा विचारच न्यायालय करीत नाही. ते फक्त पाश्चात्य विचारसरणीचाच जास्त विचार करीत असतात. काही दिवसीपुर्वी न्यायालयानं आपला देश महान असतांना व या देशात विवाह हा संस्काराचा एक महत्वपूर्ण पैलू असतांना लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याचा निवाडा दिला. ह्या निवाड्यानुसार याही देशात लिव्ह इन रिलेशनशिपचे वारे वाहात असतांना व विवाह नावाचा महत्वपूर्ण संस्कार हद्द्पार होत असतांना कायद्याची गरज लक्षात घेवून व कायद्याचाही विकास व्हावा या उपक्रमातंर्गत पंजाब आणि हरयाणा हायकोर्टानं एक महत्वपूर्ण टिप्पणी केली. ती म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणा-या जोडप्यांना संरक्षण द्यावं.
लिव्ह इन रिलेशनशिप……..स्वतःच्या मनमर्जीनं तरुण तरुणींनी स्विकारलेला मार्ग. त्यांना मुलं हवी असतातच असे नाही. त्यांची फक्त एकच इच्छा असते, ती म्हणजे आपली कामेच्छा पूर्ण होणे. त्यासाठी ते हा मार्ग पत्करतात. त्यातच हे लिव्ह इन रिलेशनशिप त्यांच्या परीवाराला मंजूर नसतं. ते त्यांच्यावर आत्मघाती हमले करु शकतात. तसाच समाजही आत्मघाती हमले करु शकते. पालक यासाठी आत्मघाती हमले करतात. ती म्हणजे त्यांची अब्रू जाणे. ज्या घरची मुलगी अशी लिव्ह इन रिलेशनशिप अंतर्गत राहते. त्यांच्या परीवाराला समाज दोष देत असतो नव्हे तर वाळीत टाकत असतो. त्यांना समाजात तोंड दाखवायला जागा उरत नाही. म्हणून आत्मघाती हमले. तसा समाज आत्मघाती हमले करतो. कारण देशाची अब्रू. आमचा देश महान आहे. ह्या देशाची शान जावू नये. हा देश पाश्चात्य विचारांचा नक्की बनावा. परंतू ते पाश्चात्य विचार लिव्ह इन रिलेशनशिपनं वागून प्रस्थापित करु नये. पाश्चात्य विचार हे सांस्कृतीक बदलासाठी असावेत. संस्कृती बदलासाठी नाही.
या देशात मुघल आले. त्यानुसार इथे बुरखा पद्धती आली. ते ठीक आहे. कारण पूर्ण शरीर झाकून असतं. कोणाच्या अश्लील भावना वाढीस लागत नाहीत. परंतू इंग्रज आल्यानंतर अर्धनग्न संस्कृती आणणे आणि या देशात बलत्काराचे प्रणाम वाढविणे हे काही योग्य नाही.
अर्धनग्न संस्कृती…….ती ब्रिटनसारख्या भागात ठीक आहे. कारण ब्रिटनचा भाग दमट हवामानाचा असून त्या ठिकाणी अंगावर कपडे सहनच होत नाहीत. म्हणून तिथं अर्धनग्न कपडे वापरणे ठीक आहे. त्यातच त्या ठिकाणी भारतासारखी महान संस्कृती नाही. म्हणून तिथं लिव्ह इन रिलेशनशिप ठीक आहे. परंतू भारतात लिव्ह इन रिलेशनशिप योग्य नाही. कारण येथील संस्कृती महान आहे. त्यातच या संस्कृतीत अश्लीलतेला अजिबात स्थान नसल्यानं विवाहापुर्वीची लिव्ह इन रिलेशनशिपची अश्लीलता इथे खपत नाही. म्हणूनच समाज आत्मघाती हमले करतो. परंतू आता त्याला कायद्यानं संरक्षण दिलं आहे. ते म्हणजे लिव्ह इन रिलेशन पद्धतीनं राहात असलेल्या जोडप्यांनी जर पोलिस संरक्षण मागीतलं तर ते वेळोवेळी द्यावं लागेल. याचाच अर्थ असा की आता भोळ्याभाबड्या मुलींना श्रीमंत घरची मुलं फसवतील. त्यांना लिव्ह इन रिलेशनशिप अंतर्गत एकत्र राहण्याला बाध्य करतील. त्या दरम्यान त्यांच्यावर आपली कामेच्छा दाखल करतील नव्हे तर भागवून घेतील. पुढे त्यांची कामेच्छा पूर्ण होताच त्यांच्यात दरार निर्माण होईल व त्याचाच परीणाम हा की त्यांच्यात विलगीकरण होईल अर्थात ते एकमेकांपासून दूर होतील.
पंजाब आणि हरयाणाचा न्यायमूर्ती अनुप चितकाराचा तो हायकोर्टाचा बेंच. त्या बेंचवर असलेला लिव्ह इन रिलेशनशिपचा खटला. दि. ०१ मार्चला दै नवराष्ट्र या वर्तमानपत्रात आलेली याबाबतची बातमी नागरीकांचे होश उडवून गेली. पाश्चात्य विचार सरणी नक्कीच बदलायला हवी. स्रीयांना स्वातंत्र्य नक्कीच मिळायला हवं. बुरखा जायला हवा. हे बरोबर आहे. ट्रिपल तलाकही नको. कारण त्यामुळं स्री स्वातंत्र्यावर गदा येते. परंतू लिव्ह इन रिलेशनशिप हे काही योग्य वाटत नसतांना व त्यावर वाद सुरुच असतांना आता नव्यानं त्याच कायद्याअंतर्गत त्याच रिलेशनशिप अंतर्गत राहणा-या लोकांना संरक्षण देणं. त्याला कायद्याचं पाठबळ मिळणं नागरीकांना योग्य न वाटणारं पाऊल आहे. परंतू न्यायालयच ते……..त्यांच्याबद्दल काय बोलावं. त्यांनी योग्य विचार करुनच न्यायदान केलं असेल. त्यांच्या मतानुसार जीवीत स्वातंत्र्यावर गदा येत असेल. कारण संविधान कलम व राज्याच्या तसेच संविधानाच्या अनुच्छेद २१ नुसार जीवासाठी संरक्षण मिळणे हा मूलभूत अधिकार आहे.
बदल होणे काळाची गरज आहे. तो व्हायला पाहिजेच. परंतू असा बदल की विवाहापुर्वी एकत्र राहणे. कामेच्छा पूर्ण करणे. त्यातच पुत्रही राहणे. ही कामेच्छा पूर्ण होतात विलगीकरण. पुत्र एखाद्या अनाथालयात नाहीतर कच-याच्या ढिगा-यावर. पुत्रप्राप्ती करणे आणि पुत्र पैदा करणे ठीक आहे. परंतू पुत्र पैदा होताच त्याची विल्हेवाट कच-याच्या ढिगा-यावर होणे यात त्या बिचा-या नवजात बालकाचा कोणता दोष की त्याला शिक्षा मिळावी किंवा कामेच्छा पूर्ण होताच त्या स्रीला सोडणं यात त्या स्रीचा तरी कोणता दोष?
महत्वपूर्ण गोष्ट ही की लिव्ह इन रिलेशनशिपच्या याच प्रकारच्या विचारसरणीमुळं हा कायदा अजुनही कचाट्यातच सापडला आहे. त्याचं संरक्षण दूरच. असं असतांना पंजाबचं हायकोर्ट केवळ बदलाचा विचार करुन प्रेमीयुगलांना संरक्षण देतं नव्हे तर बाजू मांडतं की कायद्याचाही विकास व्हावा.
२) आपला देश हा महान देश आहे. आपल्या देशाची संस्कृती महान आहे. आदर्श अशी असलेली संस्कृती. या देशात मायबापाला देव संबोधलं जातं. त्याचं कारण म्हणजे त्यांनी दिलेले संस्कार. हे संस्कार मायबाप देत असतात. परंतू ज्या घरचे मायबाप असे असतात की जे आपल्या मुलांच्या बोलण्याची शहानिशा न करता केवळ त्यांचे लाड पुरवून त्यांना हव्या त्या वस्तू मिळवून देतात. त्यांना हवं तसं वागू देतात. त्यांच्या हव्या त्या वागण्यावर आक्षेप घेत नाहीत. शिक्षक काही कुरकूर करीत असतील तर त्यांना धमक्या देतात. त्या घरच्या मुलांना शाळा कसं काय वळण लावू शकेल. तसेच कसे काय संस्कार टाकू शकेल. ही विचार करणारी बाब आहे.
महत्वपूर्ण गोष्ट अशी की शाळा विद्यार्थ्यांना वळण लावायचे काम जरी करीत असेल. परंतू त्यासाठी शाळेला पोषक वातावरण हवे. त्यांच्यावर पाल्यांना रागविण्याबद्दल दबाव नसावा. त्यातच शाळेला न्यायालयाची पाहिजे त्या प्रमाणात भीती नसावी. तेव्हाच शाळेत संस्कार फुलवता येईल यात शंका नाही. तसेच विद्यार्थी वर्गालाही वळण लावता येईल यात शंका नाही. पण……..कायद्याचा धाक असल्यास वा मायबापाची धमकी असल्यास ती शाळाही मागेपुढे पाहिल. यातूनच पुढे विद्यार्थ्यात लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याची इच्छा निर्माण होईल. ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्येच राहतील. पुढे त्यांची कामेच्छा पूर्ण झाल्यावर एकमेकांना दोष देत सोडतील. त्यांना त्यांचे मायबाप जवळ घेणार नाहीत. ते एकमेकांना सोडतील. त्यातच त्यांच्या आत्महत्या होतील यात शंका नाही.
ते जेव्हापर्यंत एकत्रीत राहतील. तेव्हापर्यंत कायद्याच्या कलम २१ अंतर्गत संरक्षणही मागतील. त्यावेळी ते नादान असतील. त्याचा परीणाम वाईटच निघेल. परंतू तसा कायदाच असल्यामुळं त्यांना शाळाही काही बोलू शकणार नाही. पालकही काही बोलू शकणार नाही. तसा समाजही. कारण त्यांना कायद्याचं संरक्षण असेल. संस्कार त्यांच्यापासून केव्हाच दूर पळालेला असेल. यात शंका नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०