Uncategorized

तेव्हाच लोकशाही मजबूत होईल  -विनोद आवळे यांचा लेख

तेव्हाच लोकशाही मजबूत होईल  -विनोद आवळे यांचा लेख

राजकीय भाष्य सुरू असलं की राजकारणातील गोडी आणि राजकीय चर्चा आपोआप वाढण्यास सुरूवात होत असते. राजकारणाच्या डफलावर कोण विराजमान होणार? कुणाला संधी मिळणार? याचा ताळमेळ कधीच कोणाला लागु शकत नाही, आणि लागणारही नाही. कारण ते राजकारण आहे.

राजकारणाचा अभ्यास करणारी विश्लेषक अभ्यासाने, अनुभवाने, अतिउत्साहाने आपली भुमिका मांडत असतात. आपला एक अंदाज बांधत असतात. कधी खरं ठरतं तर कधी असफलही. ग्रामपंचायत ते संसदेपर्यंत राजकारणाची थाप एका डंकात सामावलेली असते. अन् हेही तितकंच महत्वाचं आहे की राजकारणातूनच समाजाचा विकास उभा करता येतो. पण समाजाचा विकास उभा करण्यासाठी समाजकारण अंगी लागतं, समाजकारण करण्यासाठी लागतं राजकारण. अन् राजकारणाच्या पटलावर उभं राहण्यासाठी लागतं ते रणभूमीवरील डावपेच अर्थात “राजकीय रणनीती”..रणनीतीच ठरवेल साध्य कि असाध्य.

देशाच्या, राज्याच्या राजकारणात विविध संघटनांचा आपला पक्ष मजबूत करण्याकडे कल असतोच. अनेक पक्ष राजकारणातून समाजकारण ही रीत आपल्या पाठीशी ठेऊन वावरत असते. पण जनतेला सावरत नसते. मग जनतेचं काय? मग आपली लोकशाही बळकट कशी?

प्रथम जनतेचा विचार न करता काही पक्षाचा फापट पसाऱ्याकडे अधिक रस दिसून येतो. तेव्हा जनताही काही भूलथापांना बळी पडते. पण..जनता अशा भूलथापांना बळी पडण्यापेक्षा आपण बजावलेला मतदानाचा हक्क कायम डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. तो हक्कच आपली अन् जनतेची ताकद वाढवु शकतो. तीच ताकद सत्तेत असणार्‍या पक्षाकडे सतत प्रश्नांची पाठ धरू शकते. पण लोकशाहीच्या भूमीत वास्तव करणारी फुटपाथवर भरकटणारी गरीब-मजदूर, हातावरची पोट असणारी कष्टकरी जनता आपल्या प्रश्नासाठी सत्ताधाऱ्यापर्यंत पोहचू शकत नाही. कोणीतरी पोहचू देत नाही. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या हक्काची ताकदच उभी हवी.

जिथे सत्तेच्या चाव्या ज्या पक्षाकडे आहे किंबहुना ज्या पक्षाकडे येणार आहे. त्या पक्षाकडून जनतेला एकच अपेक्षा असते. ‘आपल्या सभोवतालचा सर्वांगिन विकास आणि सोयी-सुविधा’.. देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान तर महत्वाचेच आहे. पण त्यासाठी समाजातील शेवटच्या माणसातील विकासाचे प्रारूप भारतीय लोकशाहीत दिसायला हवं. तेव्हाच खरी लोकशाही अधिक मजबूत होईल आणि तो पक्ष देखील.

 

विनोद आवळे ,सांगली

-91 96733 38017

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button