महाराष्ट्राची लोककला ‘गोंधळ’ आजही जिवंत.! प्रा. डॉ सुधीर अग्रवाल यांचा लेख

महाराष्ट्रातील लोककला या प्रकारात कीर्तन आणि तमाशानंतर गोंधळाला विशेष महत्त्व आहे. गोंधळ आणि गोंधळी प्राचीन काळापासून लोककला प्रकारात मोडली गेले आहे. विशेषत: तुळजाभवानी आणि रेणुकामाता या देवींच्या संदर्भात गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे. कालांतराने अन्य देवींच्या बाबतीतही गोंधळ घालण्याची प्रथा सुरू झाली.
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात गोंधळ व गोंधळी ही लोककला हरवत आहे.मात्र किरण बहु उद्देशीय संस्था वर्धा द्वारा शिवार संमेलनातून गोंधळ या लोककलेला पूर्णजीवीत करून ही कला परत एकदा लोकांससोर संमेलनातून सादर करण्यात आली.
वर्धा जिल्ह्यातील कुरझडी येथे दि २० एप्रिल २०२२२रोजी किरण बाहुउद्देशीत सेवाभावी संस्थेद्वारा आयोजित शिवार संमेलनातून गोंधळ,लोक रामायण,लोकगीत कवी संमेलन,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे राष्ट्रीय भजन व मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खरांगणा मोरांगांना येथील जय भवानी गोंधळी मंडळाद्वाने माता जगदंबा,रेणूकदेवी व अंबाभवानी जागृत केले.
गोंधळ ही महाराष्ट्राची लोककला आहे आणि गोंधळगीत हे वाङ्मय. या दोन्ही गोष्टी पुढे अविरत वाहील्या पाहिजेत. त्यात कुठेही अडथळा येता कामा नये. त्याच स्वरूप कुठेही बदलता कामा नये. कारण ही आपल्या संस्कृतीची खरी संपदा आहे.
परशुरामाने बेटासुर नावाच्या दैत्याचा वध करून त्याचे शिर तोडले. त्या शिराच्या ब्रम्हरंध्रात त्याच्याच शिरांचे तंतू ओवले आणि ते खांद्यावर घेऊन ‘तिंतृण-तिंतृण’ असा ध्वनी काढीत तो रेणुकेजवळ आला. बेटासुराच्या धडाचे चौंडके आणि शिरांचे तुणतुणे वाजवून परशुरामाने जे हे पहिले मातृवंदन केले त्यातूनच गोंधळाची प्रथा उगम पावली. परशुरामाने केलेले मातृवंदन म्हणजेच गोंधळ. परशुरामाने आपल्या अंगावरच्या मळातून मनुष्यकृती निर्माण केली. तिला जिवंत केले; तोच हा गोंधळी. परशुरामाकडून त्याला गोंधळाचा मंत्र मिळाला अशी कथा आहे. महाराष्ट्रात कोल्हापूरची अंबाभवानी, तुळजापूरची जगदंबा, माहुरची रेणुकाआई अशी आईची अनेक दैवते आहेत. जगदंबेचे उपासक गोंधळी तिच्या पूजेतून एक गोंधळ उभा करतात. माफक अभिनय आणि सूर-तालातून गोंधळी ‘आख्यान’ लावतात. पायघोळ अंगरखा, कमरेला उपरणे, डोक्याला लाल पागोटे, गळ्यात कवडयांच्या माळा आणि संबळाच्या तालावर तुणतुणे आणि झांजेचा ठेका देत हे देवीचे भक्त गोंधळ घालतात. सुरेल आवाज, मुद्राभिनय, हलकेसे आणि वाजवी नृत्य हे या लोककलेचे वैशिष्ट्य आहे.
आई अंबाबाई ही महाराष्ट्राची कुलदेवता. या अंबेच्या नावाने गोंधळ घालणे हा मराठी माणसाचा कुलाचार. कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी, अभिवृद्धीसाठी तसेच विवाहानंतर शुभकार्यात गोंधळ घालण्याची पध्दत आहे. गोंधळी यजमानांच्या अंगणात आई अंबेच्या स्वरूपात घटस्थापना करतात. संबळ, खंजिरी, झांज, तुणतुणे या वाद्यांच्या तालावर आवाहन करून सर्व देवदेवतांना यजमानांच्या घरी बोलावतात. अंबेचे स्तवन करतात. पुराणातील एखादे आख्यान लावतात. संबळाच्या तालावर चाललेला हा गोंधळ पहाटेपर्यत चालतो. आपल्या दापोलीत जालगावातील ‘लष्करवाडी’ ही आधी गोंधळेवाडी म्हणून ओळखली जात असे. येथे आजही गोंधळी समाजाची घरे आहेत. त्यांतील गायकवाड घरातील ‘रवींद्र गायकवाड’ हे आजही घराण्याच्या वारसा राखून आहेत. सबंध दापोलीत धार्मिक गोंधळ पूजा सांगणारे ते केवळ एकमेव. आई जगदंबेचा आशीर्वाद आणि आठ पिढ्यांनी सोपवलेला वसा म्हणून ते आपल्या या कार्याकडे बघतात. गोंधळगीतांबद्दल त्यांच्याजवळ विचारणा केल्यास, गोंधळीची वस्त्र परिधान केल्यानंतर व संबळ हाती घेतल्यानंतर अंगात एक शक्ती संचारते व भक्तीची कवन आपोआप मुखातून बाहेर पडतात; असं ते सांगतात. ही कवने आधी कुठेही लिहलेली, वाचलेली, ऐकलेली नसतात. ती त्या गोंधळात जन्माला येतात आणि संपतात, असं त्याचं म्हणणं आहे.
वर्धा जिल्ह्यातील खरांगणा, मोरांगणा, केळझर येथे गोंधळी समाजाची घरे असून हा समुदाय अजूनही प्रसंगानिमित्ताने गोंधळ घालून देवी उपासना करतात.अलीकडच्या काळामध्ये अनेक मनोरंजनाची साधने निर्माण झाल्याने ही पारंपारिक लोककला आधुनिक युगामध्ये लोप पावत असल्याचे दिसून येते. मात्र, आजही गोंधळी समाजाच्या वतीने ही लोककला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केल्या जातो.
गोंधळ,लोक रामायण हा आमचा सांस्कृतिक वारसा आहे,तो लोप होता कांमा नये.या लोक कलांची कदर व्हायला पाहिजे,,त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे.किरण बाहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा प्रा डॉ रत्ना नगरे यांनी परत एकदा शिवार संमेलनाच्या माध्यमातून या लोककलेला पुनर्जीवित केले आहे.
लोकांचे जगणे सुसह्य करणाऱ्या लोककला आता लोप पावू लागल्या आहेत. हे लोकसंचित चिरकाल टिकण्यासाठी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने लोककलांसाठी स्वतंत्र धोरण करण्याचा निर्णय घ्यायला पाहिजे.
महाराष्ट्राची लोककला ‘गोंधळ’ आजही जिवंत.!
प्रा डॉ सुधीर अग्रवाल

प्रा. डॉ.सुधीर अग्रवाल
९५६१५९४३०६