न्यायव्यवस्थेच्या सुरक्षेचा प्रश्न चिंताजनक.! प्रा डॉ सुधीर अग्रवाल यांचा लेख
न्यायव्यवस्थेच्या सुरक्षेचा प्रश्न चिंताजनक.! प्रा डॉ सुधीर अग्रवाल यांचा लेख
सर्वोच्च व्यवस्था असलेल्या न्यायालयीन परिसरात हिंसेच्या वाढत्या घटना चिंतनीय असून अलिकडे न्यायालयीन परिसरात व न्यायमंदिरात न्यायाधीशांसमक्ष चाकू हल्ला होण्याचे प्रमाण वाढल्याने न्यायव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत आहे.
वर्धा येथील न्यायालयात न्यायाधीशां समक्ष एका आरोपीने महिला वकीलावर चाकू हल्ला केल्याने न्यायालयीन परिसरात चांगलीच खळबळ उडाली.ही घटना दि २२/३/२२ रोजी वर्धा जिल्ह्या न्यायालयीन परिसरात न्यायाधीशां समक्ष घडल्याने परत एकदा न्यायव्यवस्थेच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.
न्यायालयीन परीसरात हिंसाचाराच्या घटना नवीन नाहीत.या आधी देखील अशा घटना राज्यातील व देशातील न्यायालयात घडलेल्या आहेत.प्रश्न हा आहे की न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च ठिकाणी हिंसाचाराच्या घटना का घडतात..न्यायालयीन परिसरात चोख बंदोबस्त नसावा का..? या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था व सीसीटीव्ही फुटेजची व्यवस्था असायला पाहिजे.वारंवार घडणाऱ्या घटनांपासून शासन व प्रशासन कधी बोध घेणार.
नवी दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या एका गँगस्टरची गोळ्या घालून हत्या २०१९ मध्ये करण्यात आली होती. त्यावेळी हल्लेखोर आणि पोलिसांमध्ये गोळीबार झाला होता.
न्यायालयातील निवाड्याची वाट न पाहता स्वत:च न्याय करणं, अशीच घटना नागपुरात २२ वर्षांपूर्वी घडली होती. काय झालं होतं तेव्हा?
नागपूरच्या कस्तुरबा नगरात कालिचरण यादव ऊर्फ अक्कू यादव याची दहशत होती. परिसरातील लोकांना धमकावणं, खंडणी मागणं आणि खुनांच्या गुन्ह्यांमध्येही आरोपी होता. यासोबतच परिसरातील महिलांची छेड काढणं, त्यांच्यावर अत्याचार करणं, बलात्कार, अशा जवळपास १० वर्षांपासून चालत आलेल्या अक्कूच्या जाचाला परिसरातील महिला कंटाळल्या होत्या.
पण तो या सर्व गुन्ह्यांमधून जामिनावर यायचा. ‘पोलीस माझं काहीही बिघडवू शकत नाही,’ असं परिसरातील लोकांना धमकावायचा.अक्कुच्या दहशतीमुळे परिसरातील महिला इतक्या चिडून होत्या की त्याची हत्या करण्याची योजनाच त्यांनी तयार करून ठेवली होती.
अक्कूला कोर्टात जेव्हा न्यायधीशांसमोर उभा राहिला, तोच महिलांनी अचानक त्याला पोलिसांच्या तावडीतून खेचून बाहेर काढलं. त्यांनी अक्कूवर दगड-काठ्यांनी हल्ला केला, त्याच्या चेहऱ्यावर मिरचीपूड फेकली.
महिलांच्या मनांत अक्कू यादवबद्दल एवढा राग होता की अक्कू यादवच्या मृतदेहावर ७०हून अधिक घाव झाले होते. त्याने कथितरीत्या बलात्कार केलेल्या एका पीडितेने तर भाजी चिरण्याच्या सुरीने त्याचा गुप्तांग छाटलं! हा हल्ल्यात तो गतप्राण झाला.
न्यायव्यवस्था आणि पोलीस यंत्रणा या दोन भिन्न यंत्रणा आहेत. पोलिसांनी तपास करायचा, पुरावे जमा करून ते न्यायालयासमोर सादर करायचे आणि न्यायालयानं शिक्षा द्यायची, अशी व्यवस्था घटनेनं करून दिली असताना कायदा हातात घेणं अयोग्य आहे.
न्यायालयाशिवाय कुणालाही शिक्षा देण्याचा अधिकार नाही. गुन्हेगार संपवून गुन्हे संपणार नाही, तर गुन्हेगारी प्रवृत्ती कशी संपविली जाईल, याकडे लक्ष देण्याचं आवश्यक आहे.
९५६१५९४३०६