समिश्र

लिव्ह इन रिलेशनशिप व घटस्फोट ; कायद्यात बदल हवा

लिव्ह इन रिलेशनशिप व घटस्फोट ; कायद्यात बदल हवा

 

 

दै नवराष्ट्रला दि. २४/०३/२०२२ ला एक बातमी वाचली. वाचून मन शुन्न झालं.वाटलं की आजच्या काळात स्रीवर नाही तर पुरुषांवर अत्याचार सुरु आहेत की काय?
खरं आहे ते. कारण अशीच ती बातमी. दिल्ली हायकोर्टातील अशीच ती बातमी. घरगुती हिंसाचार कायद्यातंर्गत महिलेला सासरी राहण्याचा अधिकार हा हिंदू विवाह कायद्यानुसार आहे. ते खरंही आहे. त्यातच मुलासोबत सुन राहात नसल्यानं सासूनं तिला घरात राहण्याचा अधिकार सासूनं फेटाळून लावला होता. परंतू या प्रसंगी दिल्ली न्यायालयानं सांगीतलं की सदर प्रकरणात जरी ती मुलासोबत राहण्यास तयार नसेल, तरी ती मुलासोबत न राहता सासूच्या घरी ती राहू शकते.
कौटूंबीक हिंसाचार कायदा बनला. त्यातच या कायद्यातंर्गत सासू, सासरा, दीर, ननद हे शिरजोर ठरु लागले. त्यातच ते एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप लावू लागले. यानुसार मुली वरचढ ठरल्या तर मुलं मात्र वरचढ न ठरता खालमानी ठरली.
पुर्वी मुलींचे स्वयंवर होत असत. या स्वयंवरात मुलींना पाहायला व जिंकायला मुलं येत. ते आपल्या कर्तबगारीनं मुलींचं मन जिंकत असत. त्यातच एक स्पर्धा असे. या स्पर्धेत जो जिंकला. तोच तिच्याशी विवाह करीत असे. मग त्याला कितीही पत्न्या का असेना.
स्वयंवरच ते……… त्या स्वयंवरानंतर ती स्री पत्नी म्हणून पतीच्या घरी येत होती. त्यातच पुढे कमी कमी जास्त झाल्यास ती मायबापाला दोष देत नव्हती. त्याचे कारण म्हणजे ते मायबाप म्हणत असत की बेटा, तू स्वयंवरात स्वतः पती निवडला. आम्ही तुला वर निवडून दिला नाही. तेव्हा तू त्याला पती म्हणून स्वतःच स्विकारले असल्यामुळे आम्ही आता त्यांनी कमीजास्त केल्यास त्याला काहीही बोलू शकत नाही वा जाब विचारु शकत नाही. तेव्हा तूू दिल्या घरी सुखी राहा. होणा-या त्या वाईट गोष्टीचा विचार न करता मायबाप तिला कसायाला दिली गाय आणि तिची आशा काय, म्हणत तिला आसरा देत नसत. त्यातच तो पती तिला हातातील कळसुत्री बाहूली समजत तिचा हवा तसा वापर करीत असे. तसेच तिला ठारही करीत असे वा तिच्याचसमोर दुसरी पत्नी विवाह करुन आणत असे. असे त्या काळात मोठमोठे राजे रजवाडे होवून गेले की त्या राजांनी चार चार आणि त्यापेक्षाही कितीतरी जास्त भार्या बनवल्या होत्या. आज मात्र तशी परीस्थिती नाही. मुस्लीम विवाह पद्धतीत दोन किंवा त्या पेक्षाही कितीतरी जास्त पत्नी बनविण्याचा अधिकार आहे. परंतू त्यात बंधन आहे एक. ते म्हणजे लाचार मुलगी जर असेल समाजात तर दुसरा विवाह मुस्लीम बांधव करु शकतो. हिंदू विवाह पद्धतीत एकच पत्नी विवाहाची पद्धत आहे तर ख्रिश्चन मध्ये काँन्टैक्ट मैरेज. त्यामुळं ही विवाहाची पद्धत पाश्चात्यांनीच सडवली आहे. असं वाटायला लागलं आहे. आज सरकारनं दिल्ली हाईकोर्टातून घटस्फोटानंतरही पत्नीला सासरी राहण्याचा हक्क देवून पतीला एकप्रकारे सारासार आत्महत्याच करायला लावलेली आहे. त्यातच आज या प्रकारच्या निर्णयातून पत्नी वर्ग विचारानं शिगेलाही पोहोचू शकतो. प्रत्येक पत्नी आता दिल्ली हायकोर्टाचा हवाला देवून हे घटस्फोट झाल्यानंतरही घरात येईल. परंतू पतीला हात लावू देणार नाही. आज तीच गोष्ट दररोज पाहू पाहू पतीवर्ग गुदमरुन मरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अलिकडे सरकारनं हा घटस्फोटानंतरच सासरी राहण्याचा खटला नाही, तर आज सरकारनं दुसरा असा कायदा आणला आहे तो म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप. यामध्ये कोणताही माणूस कोणत्याही अठरा वर्षे वयाच्या मुलीसोबत अगदी विवाह न करता राहू शकतो. त्यामुळं साहजिकच विवाहाचं महत्व पूर्णतः कमी झालेले असून ही गोष्ट बिघडलेल्या लोकांसाठी ठीक आहे. तसेच आपली कामाख्या पुर्ण करुन घेणा-या लोकांसाठी ठीक आहे. कारण त्यांची वासना पुुर्ण होवू शकते यातून. वासना पूर्ण झाली की सोडा एकमेकांना. जीवनभर विवाह करुन बंधनात राहण्याची गरज नाही. परंतू यात मुलांचं नुकसान होतं. आज याच वासना पुर्तीच्या लोभानं व वासनापुर्तीसाठी अगदी खुल्लेपणानं कोणाचीही भीती न बाळगता लोकं लिव्ह इन रिलेशनशिप अंतर्गत राहात असतात. किंबहूना यात एक नुकसान झालं. ते म्हणजे मुलांचं नुकसान. लोकांना लिव्ह इन रिलेशनशिप अंतर्गत संधीच मिळाली एकत्र राहण्याची. मग अठरा वर्षे पेक्षा वयाची मुलंं मुलीच नाही तर चाळीस ते पन्नास वयाचे विवाहीत असलेली मंडळीही आपआपल्या पत्नीला सोडून लिव्ह इन रिलेशनशिप अंतर्गत राहायला लागली. त्यातच पुलिस स्टेशनला मिसींगच्या तक्रारीही वाढल्या. अमुक महिला गायब झाली. अमुक पुरुष हरवला आहे. त्यातच अशा घटनांच्या वाढत्या प्रमाणानुसार पोलिसांनीही अशा हरविलेल्या महिला पुरुषांचा शोध घेणे बंद केले. याचा परीणाम त्यांच्या मुलांवरही झाला. त्यांचे जे आजोबा होते. ते आजीआजोबा ते युगल पळून जाताच आपल्या नातवंडाला सांभाळू लागले. याबाबत एक प्रसंग सांगतो.
एक महिला, जिला दोन लहान मुलं होती. ती एका घराजवळच्या माणसासोबत पळून गेली. त्यातच तोही तिच्या बहिणीसोबत पळून गेला. पुढे ती दोन मुलं. ती मुलं वस्तीकर्त्यांनी ती मंडळी काही दिवसानं परत न आल्यानं आश्रमात टाकली.
महत्वपूर्ण गोष्ट ही की त्या मुलांचा गुन्हा काय की त्यांना आश्रमात राहावं लागावं. ती मुलं गुन्हेगार कशी की त्यांना मायबाप दोघांनी सोडावं. त्यानंतर ते युगल सापडलेही. तरी त्यांना, त्यांनी मुलं सोडली तरी शिक्षा देता येणार नाही. कारण लिव्ह इन रिलेशनशिप. मग कशाला हवं असलं लिव्ह इन रिलेशनशिप. जी लहानमुलांची जिंदगी बरबाद करु शकते.
एक दुसरा प्रसंग सांगतो. यात एक महिला दुस-या मुलांसोबत राहण्यासाठी आपल्या मुलांला जीवंत गाडण्याचा प्रयत्न करीत असतांना समाजसेवक मंडळी वाचवतात. शेवटी या समाजसेवक मंडळींच्या धाकानं ते पोलिस स्टेशनला देतील म्हणून तो मुलगा तिला पळून जातो. हे असलं असतं लिव्ह इन रिलेशनशिप. फक्त मतलबापुरतं. ते ऐन संकटाच्या वेळी कामात येत नसतं. हं मतलब असला की बरोबर सुचतं मतलबासाठी मतलबापुरता लिव्ह इन रिलेशनशिप.
आज असंच लिव्ह इन रिलेशनशिप चालत आहे. वासनापुर्ती होत आहे. मुलं वा-यावर सुटत आहेत. सापडले तरीही शिक्षा नाही. परंतू मुलं वा-यावर सुटतात त्याचं काय? याचसाठी आणखी थोडा विचार करण्याची गरज आहे. तसाच हाही विचार करण्याची गरज आहे की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये नक्की राहा. परंतू आपल्या मुलांची योग्य विल्हेवाट लावा. असे जर झाले नाही तर त्या विवाह तोडणा-या आणि पळून जाणा-या लोकांना माफी देवू नये. त्यांना अटक करुन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. त्यासाठी या लिव्ह इन रिलेशनशिपच्या कायद्यात थोडा बदल करण्याची गरज आहे हे तेवढंच खरं. तसेच घटस्फोटाबाबतही कायदे बदल. हेही तेवढंच गरजेचे आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button