दुट्टप्पी अमेरिका ..प्रा. डॉ सुधीर अग्रवाल यांचा लेख
दुट्टप्पी अमेरिका ..प्रा. डॉ सुधीर अग्रवाल यांचा लेख
भारताला शहाजोगपणाचे सल्ले देणाऱ्या आणि रशियासोबतचे व्यापारी संबंध तोडण्यासाठी दबाव आणणाऱ्या अमेरिकेनं स्वत: मात्र रशियाकडून होणारी तेल खरेदी वाढवली आहे. अमेरिकेनं गेल्या आठवड्याभरात रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केलं आहे. अमेरिकेच्या खरेदीत ४३ टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती रशियन सुरक्षा परिषदेचे उपसचिव मिखाईल पोपोव यांनी दिली. अमेरिका रशियाकडून दररोज १०० हजार खनिज तेल अधिक खरेदी करत आहे. त्याचवेळी अमेरिका भारतासह इतर देशांना रशियाकडून तेल खरेदी करू नका यासाठी दबाव आणत आहे.
भारतावर निर्बंध लावणारा अमेरिका स्वतःच रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्या देशाचा बळी घेणे हेच अमेरिकेचे धोरण आजपर्यंत राहिलेले आहे.रशिया युक्रेन युद्धातही अमेरिकेची दुट्टप्पी भूमिका समोर येत आहे. दुसऱ्या देशांना रशियांकडून कच्चे तेल खरेदी करु नका म्हणताना अमेरिका मात्र रशियाकडून कच्चं तेल विकत घेतय. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगाने रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादले आहेत. कच्च्या तेलाच्या निर्यातीत रशियाचा वाटा मोठा आहे. आर्थिक निर्बंध लादले गेल्यानंतर रशियाने स्वस्तात कच्चं तेल विकायला काढलं. जेणेकरुन त्यांना देशाची अर्थव्यवस्था ढासळण्यापासून वाचवता येईल. भारताने रशियाकडून कच्चं तेल विकत घेताच त्याविषयी अमेरिका दबाव तयार करत होता. मात्र रशियन सुरक्षा परिषद उपसचिव मिखाईल पोपोव यांनी रशियन मिडीया दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेने रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी केली आहे.
अमेरिकेने रशियाकडुन तेलाची आयात ४० % ने वाढली आहे. अमेरिका दररोज शंभर हजार बॅरल कच्च तेल खरेदी करतंय. एवढंच नाही तर अमेरिकी कंपन्या रशियाकडून खनिजं देखील खरेदी करत आहे.
भारताने अमेरिकेचे निर्बंध झुगारून देत भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी मोठ्या सवलतीत करत आहे, ज्याकडे अमेरिकेची नजर आहे. एवढेच काय तर, काही दिवसांपूर्वी रशियाकडून अधिक तेल विकत घेणे नवी दिल्लीला महागात पडू शकते, असा इशारा अमेरिकेने भारताला दिला होता. सध्या अमेरिकेने इतर देशांना रशियाकडून तेल खरेदी करण्यास मनाई केली नसून, स्वस्त दरात अधिक तेलाची खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिका लक्ष ठेवून आहे. गेल्या वर्षी भारताने रशियाकडून १६ दशलक्ष बॅरल तेल खरेदी केले होते, मात्र यावर्षी मार्चपर्यंत भारताने रशियाकडून १३ दशलक्ष बॅरल तेल खरेदी केले आहे.
युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिकेसह अन्य आघाडीच्या देशांना रशियावर कडक निर्बंध घातले आहेत. अमेरिकेने तर, रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीवर बंदी घातली आहे. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा तेल आयातदार देश आहे. एकूण गरजेच्या ८५ टक्के तेलाची आयात केली जाते. आजवर एकूण गरजेच्या दोन ते तीन टक्के कच्च्या तेलाची रशियाकडून खरेदी करण्यात येत होती. युक्रेनावरील हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असली, तरी अन्य देशांनी खरेदीला नकार दिल्याने रशियाला स्वस्तात तेलविक्री करण्याची वेळ आली आहे. ही संधी मानून आता केंद्राने रशियाकडून स्वस्तात तेलखरेदी करण्यास सुरुवात केली आहे. युरोपीयन युनियनने रशियाशी संबंधित ‘रोसनेफ्ट’, ‘ट्रान्सनेफ्ट’ आणि ‘गजप्रोम नेफ्ट’ या कंपन्यांवर निर्बंध घातले आहेत. ‘इंडियन ऑइल’ने यापूर्वी एप्रिल २०२०मध्ये रशियाकडून शेवटची तेलखरेदी केली होती.
९५६१५९४३०६