महात्मा फुले;क्रांतीचे आधारस्तंभ
महात्मा फुले;क्रांतीचे आधारस्तंभ
सध्या आम्हाला सर्वत्र सुधारणा झालेली दिसते.महिलाही शिक्षणात आघाडीवर गेलेल्या दिसतात.दलितही सुधारलेले दिसतात.विधवाही ब-याच पुढे गेलेल्या दिसतात.केशवेपन प्रथा राहिलेली नाही.सतीप्रथा तर नाहीच नाही.
सतीप्रथेचा कायदा लार्ड विल्यम बेंटिकने बनवुन सतीप्रथेला तिलींजली दिली होती.ही सती प्रथा राजा राममोहन रायच्या प्रयत्नातुन बंद झाली होती.लार्ड विल्यम बेंटिकच नाही तर पुर्ण इंग्रज अधिकारी वर्गाच्या लक्षात सतीप्रथा वाईट गोष्ट आहे,हे राजा राममोहन रायने लक्षात आणुन दिले होते.
सतीप्रथा बंद झाली असली तरी समाजात बाकी सा-याच प्रथा जोमात सुरु होत्या.विधवा झाल्यानंतर तिचा श्रुंगार नष्ट करुन तिने पांढरी साडी घालावी.तसेच तिला पुन्हा विवाह करण्याचा हक्क नसुन तिच्याकडे कोणी पाहु नये म्हणुन तिचा चेहरा विद्रुप केला जात असे.अँसीड टाकुन नाही तर तिच्या डोक्यावरचे केस काढुन.त्या स्रियांनी आवाज उठवु नये,त्या स्रियांना या अत्याचाराबद्दल कळले तरी त्यांनी लढु नये यासाठी त्यांना शिक्षणाची बंदी घातली होती.
आजची महिला महात्मा फुलेंना विसरली असली तरी तिच्या उद्धारासाठी आवाज उठवणारा कलियुगातील पहिला मानव म्हणुन महात्मा फुलेंकडेच पाहावे लागेल.महात्मा फुलेंनी १८४८ मध्ये पुण्यातल्या शनिवारवाड्यात स्रियांसाठी पहिली शाळा जेव्हा काढली.तेव्हा फक्त विद्यार्थी म्हणुन स्रिया सहाच होत्या.त्यातही त्या महिला शिकायला नको म्हणुन त्यांना शिकवायला जाणा-या सावित्रीला लोकं शेण धसकटे फेकुन मारत.पण त्यावेळी याच सावित्रीला आधार दिला तो एका मुस्लीम स्रीने.फातिमा नाव तिचं.
महात्मा फुलेंनी जेव्हा या संदर्भात ग्रंथ अभ्यासले.तेव्हा या देशातील नीतीनियमांविषयी जाणीव त्यांना झाली व सनातनी सत्तेविरोधात त्यांनी लढाही दिला.स्री ही कोणत्याही जातीची का असेना,तिला त्रासच होता.ती ब्राम्हण कुळात जरी जन्मली असली तरी पुरुषांच्या हातचे कळसुत्री बाहुले म्हणुन तिला वावरावे लागत होते.महात्मा फुलेंनी ते ओळखले आणि त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला.त्यासाठी शिक्षीकेची गरज होती.ती गरज त्यांनी आपली पत्नी सावित्रीला शिकवुन पुर्ण केली.
महात्मा फुलेंनी केवळ स्रियांच्याच उद्धारासाठी कार्य केले नाही.तर शेतक-यांसाठीही कार्य केले.त्यासाठी त्यांनी शेतक-यांचा अासुड नावाचं पुस्तक लिहिलं.हिंदुस्तान चं वैभव पाहायला येत असलेल्या जार्ज पंचमच्या स्वागतासाठी भव्य सभागृह सजलेला असतांना माझ्या देशातील शेतकरी किती गरीब आहे हे दाखविण्यासाठी फुले त्या सभागृहात शेतक-यांच्या पोशाखात गेले होते.त्यानुसार त्यांनी इंग्रज अधिकारी वर्गांना शेतक-यांची गंभीर हालत दाखवली व ज्या देशाचा आपण कापुस वापरतो,त्या देशातील शेतक-यांचे दैन्य दुर करण्यासाठी इंग्रजी शासनाला बाध्य करणारा महात्मा फुले हा पहिला व्यक्ती होय.असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
मित्रांनो,आपण महात्मा फुलेंना सदैव स्मरणात ठेवायला हवं.कारण त्यांनी आपल्यासाठी भरपुर काही केलेलं आहे.आपण त्यांचे उपकारकर्ते आहोत.त्यांनी आपल्यावर फार मोठे उपकार केलेले आहेत.पण आज असे चित्र दिसते की आपण त्यांचे उपकार विसरलेले आहोत.ते क्रांतीचे आधारस्तंभ जरी असले तरी आज आम्हाला ते आठवत नाहीत.
आज स्रिया ब-याच पुढे जरी गेल्या असल्या तरी त्याची खरी मुहूर्तमेढ महात्मा फुलेंनी रोवलेली आहे हे विसरु नका.तुम्ही जरी पुढे गेल्या असाल,पण तुमच्या पुढे जाण्यात महात्मा फुले दांम्पत्यांचा खुप मोठा त्याग आहे हे ही विसरु नका.पण आजची स्री हे सगळं विसरत चालली आहे.आजही स्री स्वतःस गुलाम समजत पुरुसांच्या हातचे बाहुलेच बनायला पाहात आहे.जणु यासाठीच की महात्मा फुले दांम्प्त्यांनी शेण धसकटे झेलली?नाही ना.तर आता स्रियांनो उठा,आता तरी उठा आणि जागे व्हा.कार्य करत राहा.हा अंधविश्वासाचा बुरखा काढुन फेका.लढा आपल्या अधिकारासाठी.अन् दुर करा आपल्यावरील अन्याय अत्याचार.त्या चार वर्षाच्या बालिकेवर बलत्कार करतात आहेत ते लोक.त्यांना त्यांची जागा दाखवा.त्याशिवाय फुले दांम्प्त्यांना श्रद्धांजली प्राप्त होणार नाही.
अंकुश शिंगाडे नागपुर ९३७३३५९४५०
©®©