चीनचे नीरकुंश राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग
चीनचे नीरकुंश राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग
राष्ट्राध्यक्ष आणि लष्करप्रमुख म्हणून आपल्या अभूतपूर्व तिसर्या पाच वर्षांच्या कार्यकाळाची सुरुवात करताना, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना चे नेतृत्व कायम ठेवण्याचे आवाहन केले.कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना काँग्रेसची बैठक पाच वर्षांतून एकदा होते.चीनच्या विधिमंडळाच्या, नॅशनल पीपल्स काँग्रेस च्या वार्षिक अधिवेशनाच्या समारोपाच्या वेळी शी यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना चे नेतृत्व आणि पक्षाची मुख्य धोरण संस्था, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना केंद्रीय समिती यांचे केंद्रीकृत, एकसंध नेतृत्व राखण्याच्या गरजेवर भर दिला.
६९ वर्षीय शी जिनपिंग हे पक्षाचे संस्थापक माओ त्से तुंग यांच्या बरोबरीने पक्षाचे “मुख्य नेते” मानले जातात. केंद्रीय लष्करी आयोगाचे (CMC) अध्यक्ष आणि चिनी लष्कराचे प्रमुख म्हणून गेल्या आठवड्यात संसदेने त्यांना मान्यता दिली.गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांची अभूतपूर्व तिसऱ्या टर्मसाठी सीपीसीचे प्रमुख म्हणून निवड झाली, माओ नंतर दोन पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी निवडून आलेले ते एकमेव नेते ठरले.
त्यांनी स्वत: ची सुधारणा करण्यासाठी नेहमीच धैर्य आणि भ्रष्टाचाराशी दृढपणे लढण्याचे धैर्य असण्याचे महत्त्व अधोरेखित केले, असे सरकारी शिन्हुआ वृत्तसंस्थेने सांगितले. शी जिनपिंग हे ऐतिहासिक तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. अशाप्रकारे, ते प्रजासत्ताक चीनचे संस्थापक माओ त्से तुंग यांच्यानंतर सर्वात प्रदीर्घ काळ राज्य करणारे नेते बनले आहेत. त्यांच्या विरोधात दुसरा उमेदवार नव्हता यावरून त्यांच्या निरंकुश शक्तीचा अंदाज लावता येतो. चिनी संसद आणि नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या सुमारे 3,000 सदस्यांनी त्यांची निवड केली. शी यांची केंद्रीय लष्करी आयोगाच्या अध्यक्षपदीही फेरनिवड झाली आहे. जगातील सर्वात मोठी सेना असलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या अध्यक्षपदीही ते कायम राहणार आहेत.
तैवानचा मुद्दा, रशिया-युक्रेन युद्ध, अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांसोबतचे ताणले गेलेले संबंध आणि भारतासोबतच्या लडाखमधील वादाच्या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग यांनी चीनमध्ये आपली स्थिती मजबूत केली आहे, हे विशेष. चिंतेची बाब म्हणजे चीन लष्करी आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांना वेग देत आहे. यावेळी पुन्हा आपल्या संरक्षण बजेटमध्ये ७.२ टक्के वाढ केली आहे. कोरोनाचे संकट रोखण्यासाठी गेल्या तीन वर्षांत लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणवणाऱ्या चीनची स्थिती चांगली नाही. चीनची अर्थव्यवस्था संकटाच्या काळातून जात आहे. अशा स्थितीत आर्थिक पुनरुज्जीवन आणि लष्करी महत्त्वाकांक्षा यामध्ये समतोल राखणे हे शी जिनपिंग यांच्यासाठी मोठे आव्हान असेल.
मात्र, सध्याच्या भू-राजकीय समीकरणांमध्ये चीनमध्ये शी यांच्या निरंकुश सत्तेमुळे भारताला सावध राहण्याची गरज आहे. चीन ज्या प्रकारे आपल्या सीमेलगत वर मोठ्या प्रमाणात संरचनात्मक बांधकाम करत आहे त्यावरून त्याचा हेतू समजणे कठीण नाही. मात्र, भारतानेही संरचनात्मक विकासासाठी या दिशेने महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्याच वेळी, अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या नुकत्याच आलेल्या अहवालात, अमेरिकेचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि जगात महासत्ता म्हणून उदयास येण्यासाठी चीन आपल्या साम्राज्यवादी योजनांचा विस्तार करत राहील, असे म्हटले आहे. खरेतर, 2049 मध्ये जेव्हा चीन आपल्या स्थापनेची शताब्दी साजरी करत आहे तेव्हा शी जिनपिंग यांचा चीनला महासत्ता म्हणून उदयास येण्याचा मानस आहे. दुसरीकडे, भारताच्या सीमेवर निर्माण झालेली गतिरोध संपवण्यासाठी चीनकडून असा कोणताही प्रामाणिक पुढाकार झालेला नाही, जेणेकरून तणाव दूर करून विश्वासाचे वातावरण निर्माण करता येईल, ज्या वेळी शी जिनपिंग चीनमध्ये अधिक मजबूत झाले आहेत, त्या वेळी भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध घट्ट होत असताना ते प्रत्युत्तर देण्यासाठी काही प्रक्षोभक पावले उचलू शकतात. भारताने आपले सर्व पर्याय खुले ठेवले पाहिजेत. यासोबतच लष्करी आणि राजनयिक दृष्टीने पूर्ण तयारी करावी. तसे, त्याचे इतर शेजारी देश जपान, तैवान, व्हिएतनाम इत्यादी देशांनाही चीनच्या वाढत्या लष्करी सामर्थ्याची चिंता आहे. चीनच्या लष्करानंतर नौदलाला शक्तिशाली बनवण्याच्या प्रयत्नांमध्ये जपाननेही आपल्या संरक्षण बजेटमध्ये २६ टक्क्यांनी वाढ केली आहे.
विकास परसराम मेश्राम
vikasmeshram04@gmail.com