आरोग्य

जसे शरीर दमते तसे मन दमते का? मानसिक आजार असा ओळखा तज्ञाचा सल्ला

जसे शरीर दमते तसे मन दमते का? मानसिक आजार असा ओळखा तज्ञाचा सल्ला

जसे शरीर दमते तसेच मन दमते का ?

👉वर्षानुवर्षे केलेल्या मानसिक कष्टांमुळे मनही दमू शकते. छातीतली धडधड, अस्वस्थता, हुरहूर, उगाच थकवा, निराशा, अंग गळून जाणे, काही करण्याची उमेद नसणे, कामे पुढे ढकलीत रहाणे असलेल्या गोष्टींचा आनंद न घेता येणे, उगीचच वेडेवाकडे विचार मनात येणे, भविष्याबाबत नकारार्थी भूमिका मनात तयार होणे, आत्मविश्वास गमावणे, इंटरव्ह्यू परीक्षा अशा प्रसंगी सासू विसरणे, अंगदुखी, पाठदुखी, डोकेदुखी, चिडचिड वाढणे इत्यादी अनेक लक्षणे आपल्याला आपले मन दमले असल्याची, आपल्या वागण्यात विचार पध्दतीत दैनंदिन वेळापत्रकात बदल घडविणे जरुरीचे असल्याचे सांगत असतात. मनाचे दमणे दुर्लक्षल्यास त्याचे नैराश्य वा मनोविकार आजारात रूपांतर होऊ शकते.

तर
स्वतःला मानसिक आजार आहे हे ओळखण्यासाठी खालील बाबीचे लक्षणे जाणवतात.

आपले मन स्थिर आहे अस्वस्थ नाही ही असे आपणास वाटते का?
विनाकारण छातीत धडधड, हात पायांना घाम सुटणे, लोकांसमोर वावरायला भीती वाटणे, झोप नीट न लागणे, कामात लक्ष न लागणे, हुरहुर वाटत राहणे यापैकी काही होते का?

सतत आपणास कुठल्या बाबतीत न्यूनगंड वा दुःख वाटत राहते का?
सर्वसाधारण आपण आनंदी असता की दुःखी असता आत्महत्या येते आत्महत्येचे विचार मनात येतात का उगीच संशय किंवा निरर्थक विचार मनात घोळत राहतात का लोक तुमच्याबद्दल वाईट बोलत आहे तुमच्याबद्दल विरुद्ध कट कारस्थान रचत आहेत असे खात्री लायक अरत्या वाटते का कुणीही जवळ नसताना आवाज व बोलणे ऐकू येत असल्याचा भास होतो का शरीरातून वेगवेगळ्या विचित्र संवेदना जागी जाणवतात का?

वरील प्रश्न पैकी एक वा अधिक प्रश्नास होय अशी इतर असल्यास आपण स्वतःची मानसिक चिकित्सा मानोसपोचार तज्ञाकडून करून घेणे उपयुक्त ठरते.

(-संदर्भ
वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई
अंधश्रद्धा निर्मूलन समिती
-डॉ. प्रदीप पाटकर)

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button