- ..आणि पूर्णा तालुक्यातील त्या गावात 'उजेड' पोहोचला
…आणि पूर्णा तालुक्यातील त्या गावात ‘उजेड’ पोहोचला
त्याचं झालं की, गेल्या चार दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मौजे.देऊळगाव आणि मौजे.मुंबर (ता.पूर्णा) येथील विद्युत पुरवठा खांब कोसळून खाली पडले. त्यामुळे दोन्ही गावचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. परिणामी, ग्रामस्थांनी महावितरणशी संपर्क साधला. मात्र, शासकीय उत्तरांच्या पलीकडे ठोस असे काहीच झाले नाही. गावातला अंधार कायम राहिला. काळोख्या रात्रीत गावाचं गावपणच हरवून गेलं होतं.
त्यामुळे देऊळगावचे उद्विग्न ग्रामस्थ श्री.दिनेश दुधाटे यांनी हि कैफियत गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय व कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या कानावर घातली.
श्री.दुधाटे यांच्याशी बोलून झाल्यावर आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी मुंबई येथून सर्व सूत्रे हलवली आणि मित्र मंडळाचे जिल्हा संपर्क प्रमुख वक्ते श्री.संदीप माटेगावकर व पूर्णा तालुकाध्यक्ष श्री.गणेश कदम यांना महावितरणशी संपर्क करून हि अडचण दूर करण्याच्या भ्रमणध्वनीद्वारे सूचना दिल्या.
परिणामी, श्री.माटेगावकर आणि श्री.कदम यांना संबंधित अधिकाऱ्यांना घटनेचे गांभीर्य आणि आमदार साहेबांच्या सूचना कानावर घातले. त्यानंतर ‘थ्री फेस’च्या कामला लागले. फोनाफोनी झाली. कर्मचारी आणि वायरमन घटनास्थळी पोहोचले. खांब अर्थात पोल दुरूस्तीचे काम सुरू झाले आणि अवघ्या काही तासात दोन्ही गावात ‘उजेड’ पोहोचला. प्रश्न मार्गी लागला. म्हणून बाया-बापड्यासह गावकरी आनंदून गेले.
सत्तेच्या सारीपटात आपल्या काय मिळेल का? यामध्ये सगळे अडकले असताना गंगाखेड विधानसभा केवळ मतदारसंघ नसून माझा परिवार आहे, या भावनेतून ‘विकासाची गंगा’ गोदावरीच्या काठावर आणण्यासाठी जीवाचं रान करणारे धडाकेबाज आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब अशा तत्परतेमुळे जनमानसात लोकप्रिय आहेत.
प्रशासकीय कामांसाठी मुंबईत असणाऱ्या आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी तातडीने लक्ष देवून वीजेचा प्रश्न सोडविला. त्यामुळे दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी आमदार साहेबांचे आभार मानले आहेत! असा हा संवेदनशील व कर्तव्यदक्ष माणूस आमचा नेता आहे, याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. कारण, आमचा आधारवड फक्त आणि फक्त आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेबचं!
शब्दांकन
श्री.दत्तराव पौळ
मिडीया प्रमुख, पूर्णा.
मो.8805509834